पातोंडा येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 19:53 IST2021-06-07T19:52:54+5:302021-06-07T19:53:19+5:30
पातोंडा येथील ३० वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पातोंडा येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या
ठळक मुद्देआत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : तालुक्यातील पातोंडा येथील ३० वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी दिनेश सुरेश पाटील (३०) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ७ रोजी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल संदीप तहसीलदार हे करीत आहेत.