खंडणी दिली नाही म्हणून मारहाण

By admin | Published: January 16, 2017 01:02 AM2017-01-16T01:02:01+5:302017-01-16T01:02:01+5:30

जळगाव : दरमहा 5 हजार रुपयांची खंडणी देण्याचे सांगूनही ती दिली नाही म्हणून दिनेश लालजी बिंद या मजूर कंत्राटदार व त्यांच्या प}ीला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

Suicide is not given as ransom | खंडणी दिली नाही म्हणून मारहाण

खंडणी दिली नाही म्हणून मारहाण

Next


जळगाव : दरमहा 5 हजार रुपयांची खंडणी देण्याचे सांगूनही ती दिली नाही म्हणून दिनेश लालजी बिंद (वय 34 रा.कृष्णा नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) या मजूर कंत्राटदार व त्यांच्या प}ीला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी किरण शंकर खर्चे, कविता दिलीप परदेशी व आकाश दिलीप परदेशी (तिन्ही रा.कृष्णा नगर,  जळगाव) या तिघांविरुध्द रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश बिंद हे मजूर कंत्राटदार आहेत. त्यांना औद्यागिक वसाहतमधील व्ही सेक्टरमध्ये एका चटई कंपनीत मजुरांचा कत्रांट मिळाला आहे. या कंत्राटामुळे दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा म्हणून तिघांनी ¨बद व प}ीला शनिवारी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली.

 खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील,नितीन बाविस्कर, शशिकांत पाटील व अभिलाषा मनोरे यांचे पथक  मारहाण करणा:या तिघांच्या शोधासाठी पहूर येथे गेले होते, मात्र तेथूनही ते गायब झाल्याने पथक परत आले.

Web Title: Suicide is not given as ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.