पोलीस कर्मचाऱ्याची नैराश्यातून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:08 PM2019-10-01T12:08:52+5:302019-10-01T12:09:22+5:30
आजारपण व व्यसनाने नैराश्य
जळगाव : दक्षता पोलीस वसाहतीत राहणाºया जयंत दिलीप वाडे (३४, मुळ रा.आसोदा,ता.जळगाव) या पोलीस कर्मचाºयाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली. आजार व व्यसनाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जयंत वाडे गेल्या १० वर्षांपूर्वी पोलीस खात्यात रुजू झाले होते. त्यांची नियुक्ती पोलीस बँड पथकात होती. पोलीस वसाहतीत २७२ लाईन इमारत ३३ मध्ये पत्नी सोनी, दोन मुलांसह राहत होते. सोमवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पत्नी सोनी घराबाहेर अंगणात कपडे धूत असताना त्या घरात गेल्या असता त्यांना जयंत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हे दृश्य पाहून त्यांनी एकच आक्रोश केला. रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजुच्या रहिवाशांनी धाव घेत या बाबत पोलिसांना कळविले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, जिल्हा पेठचे निरीक्षक अकबर पटेल व सहकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
जयंत याचे मूळ गाव चोपडा असून आई लिलाबाई, वडील व भाऊ आसोदा येथे वास्तव्यास आहेत. लहान भाऊ राजेश तसेच मेव्हणे सुनील जमदाळेही पोलीस दलात असून तेही यावलला कार्यरत आहेत.
ंदुसरा भाऊ वडिलांना नाशिक येथे दवाखान्यात नेत असताना मालेगावहून परतले माघारी
जयंत यांचा लहान भाऊ राजेश देखील पोलीस दलात असून यावल येथे कार्यरत आहे. वडिल जयंत वाडे यांना कर्करोग असल्याने राजेश त्यांना सोमवारी उपचारासाठी नाशिक येथे घेऊन जात असताना मालेगावजवळ पोहचल्यावर जयंतच्या आत्महत्येची बातमी मिळाली. राजेश तसाच वडिलांना घेऊन माघारी फिरला. आई, वडील आसोदा येथे वास्तव्यास असतात तेथेच जयंतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.