जावयाची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 07:54 PM2021-06-07T19:54:52+5:302021-06-07T19:55:31+5:30

जावई म्हणून वास्तव्यास असलेला हरीश कौतिक कुमावत याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले.

Suicide by strangulation | जावयाची गळफास लावून आत्महत्या

जावयाची गळफास लावून आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देहिवरखेडा दिगर येथे होते वास्तव्यास, आकस्मिक मृत्यूची नोंद.

लोकमत न्यूज नेटवर्क

पहूर, ता. जामनेर : हिवरखेडा दिगर, ता. जामनेर येथे जावई म्हणून वास्तव्यास असलेला हरीश कौतिक कुमावत याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पुरुषोत्तम कुमावत यांचा जावई हरीश कौतिक कुमावत (हिवरखेडा दिगर) येथे वास्तव्यास होता. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक होता व दारूचे व्यसन होते. पत्नीला रविवारी रात्री वडिलांकडे झोपण्यासाठी पाठविले आणि एकटाच घरात झोपला.

सोमवारी सकाळी पत्नी आपल्या घरी गेली असता पती हरीश दरवाजा उघडत नाही व आवाज दिल्यावरही प्रतिसाद मिळत नाही. म्हणून, वडील पुरुषोत्तम कुमावत व राजू कुमावत यांना बोलावले. त्यांनी घराचा पत्रा उचकून पाहिले असता हरीश याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

गावातील नागरिकांच्या साहाय्याने हरीशला घटनास्थळावरून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. बादल पुरुषोत्तम कुमावत यांच्या खबरीवरून पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पश्चात पत्नी, मूल असा परिवार असून परिस्थिती हलाखीची आहे.

Web Title: Suicide by strangulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.