नायगावात मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:38+5:302021-06-27T04:12:38+5:30

यावल : तालुक्यातील नायगाव येथे एका १६ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी सायंकाळी घडली. ...

Suicide by strangulation of a child in Naigaon | नायगावात मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

नायगावात मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Next

यावल : तालुक्यातील नायगाव येथे एका १६ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी सायंकाळी घडली. सुजल रमण तडवी असे या मुलाचे नाव आहे.

आपल्या गुरांच्या गोठ्यात पत्रांच्या शेडच्या अँगलला दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर मयताचे वडील रमण रूबाब तडवी यांनी दिल्याने पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. मयत सुजल तडवी याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुजलने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तरी रागाच्या भरात त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Suicide by strangulation of a child in Naigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.