पाचोऱ्यात ९ वी तील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:28 PM2018-09-28T17:28:13+5:302018-09-28T17:32:37+5:30
पाचोरा शहरातील गो. से. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाºया विद्यार्थिनीने गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
पाचोरा : येथील गो. से. हायस्कुलमध्ये इयत्ता ९ वीत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनीने गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, भावना विशाल कोळी (वय १५ ) रा. महादेव गल्ली परधाडे रोड पाचोरा, या शाळकरी मुलीने २७ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास स्वत: च्या राहात्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने स्वत: घरचा स्वयंपाक करून वडिलांना जेवणासाठी फोन केला. त्याच वेळी आई व बहीण बाहेर बसलेले असल्याचे पाहून आतल्या खोलीत जाऊन छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने गळफास घेतल्याचे पहाताच तिला खाली उतरवून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि डॉक्टरानी तिला मयत घोषीत केले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. भावना ही गो. से हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होती. तिला शाळेत सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. भावनाची घरची परिस्थिती हलाखीची असून वडील मोलमजुरी करतात. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.