भुसावळ येथे परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:37 PM2018-11-28T17:37:35+5:302018-11-28T17:39:12+5:30

भुसावळ येथील जळगाव रोडजवळील हुडको कॉलनीजवळ एका परप्रांतीय २५ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसातपूर्वी उघडकीस आली आहे.

Suicide by taking a paranormal youth's lewd at Bhusawal | भुसावळ येथे परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ येथे परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next
ठळक मुद्देएका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलासुरुवातीला पटली नव्हती ओळखखिशातील मोबाइलवरून संपर्क साधल्यावर पटली ओळख

भुसावळ : येथील जळगाव रोडजवळील हुडको कॉलनीजवळ एका परप्रांतीय २५ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसातपूर्वी उघडकीस आली आहे. दीपक सुभाष यादव (रा.राणीपूर, ता.लालगंज, जि.आजमगड, उत्तर प्रदेश) असे मयत युवकाचे नाव आहे.
दीपक यादव याने चितोडवाणी मंगल कार्यालयाजवळ झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी साडेसात वाजता उघडकीस आले. परप्रांतीय तरुणाने गळफास घेतल्याची चर्चा कॉलनीत होताच एकच खळबळ उडाली. परिसरातील माजी नगरसेविका शारदा धांडे यांचे पती व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दीपक धांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत यादव याच्या खिशातील मोबाइलवरून पोलिसांनी एका नंबरवर संपर्क केला. तेव्हा त्याचे नाव व गाव निदर्शनास आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यातून त्याची ओळख पटली. मयत हा भुसावळ येथे कशासाठी आला होता व कुठे जात होता? त्याने आत्महत्या का केली, याची माहिती नातेवाईकांकडून समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात शहर पोल’स ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicide by taking a paranormal youth's lewd at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.