पत्नी माहेरी जाताच रामेश्वर कॉलनीत प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 02:54 PM2017-10-21T14:54:47+5:302017-10-21T14:56:30+5:30
रामेश्वर कॉलनीतील महाजन नगरात राहणाºया भागवत पंढरीनाथ वखरे (वय ४५,मुळ रा.रवडा, ता.जामनेर) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. वखरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पत्नी शुक्रवारी सायंकाळी माहेरी गेल्यानंतर वखरे यांनी शनिवारी आत्महत्या केली. दरम्यान, गेल्या आठवड्यातही याच भागात हनुमान नगरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २१ : रामेश्वर कॉलनीतील महाजन नगरात राहणाºया भागवत पंढरीनाथ वखरे (वय ४५,मुळ रा.रवडा, ता.जामनेर) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. वखरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पत्नी शुक्रवारी सायंकाळी माहेरी गेल्यानंतर वखरे यांनी शनिवारी आत्महत्या केली. दरम्यान, गेल्या आठवड्यातही याच भागात हनुमान नगरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, भागवत वखरे हे पत्नी ज्योती, मुलगा सचिन (वय १७) व मुलगी मयुरी (वय १४) असे महाजन नगरात एकत्र राहत होते तर भाऊ देविदास, वडील पंढरीनाथ संतोष वखरे,आई इंदूबाई असे शेजारीच राहायला होते. भागवत वखरे हे बांधकामाच्या ठिकाणी मजुरी तर कधी सलून काम करायचे. पत्नी ज्योती व मुलगी मयुरी शुक्रवारीच सायंकाळी माहेरी (तुकारामवाडी, जळगाव) येथे गेली होती तर मुलगा सचिन व भागवत हे दोन्ही बाप-बेटे घरी होते. मुलगा सकाळी ९ वाजताच आईकडे जाण्यासाठी निघाला होता.
शेजारचा मुलगा कटींगसाठी आल्याने उघड झाली घटना
भागवत वखरे हे सलूनचे काम करीत असल्याने शेजारचा मुलगा त्यांच्याकडे कटींग करण्यासाठी आला होता. मात्र दरवाजा आतून बंद असल्याने कोणीही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून हा मुलगा परत आला व दरवाजा कोणीच उघडत नसल्याचे आईला सांगितले. त्यानुसार त्या मुलाची आई वखरे यांच्या घरी गेली असता आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी लाकडी फडीतून डोकावून पाहिले असता भागवत यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती शेजारच्यांना सांगितली असता लोकांनी धाव घेऊन दरवाजा तोडला. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक समाधान पाटील यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.