बोदवड येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 06:13 PM2018-11-21T18:13:31+5:302018-11-21T18:15:52+5:30

बोदवड येथील प्रभाग क्रमांक सहामधील शिवद्वारजवळील रहिवासी प्रवीण सुरेश हजारे (वय २४) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. २१ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सायंकाळी त्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार होता. त्याआधीच अंत्ययात्रा निघाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Suicide by taking a youth in Bodwad | बोदवड येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बोदवड येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देपत्नीच्या डोहाळे कार्यक्रमापूर्वीच अंत्ययात्राहजारे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरआत्महत्येचे कारण समजू शकले नाही

बोदवड, जि.जळगाव : बोदवड येथील प्रभाग क्रमांक सहामधील शिवद्वारजवळील रहिवासी प्रवीण सुरेश हजारे (वय २४) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. २१ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सायंकाळी त्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार होता. त्याआधीच अंत्ययात्रा निघाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवीण हा विद्युत उपकरणे दुरुस्त करण्याचे काम करीत होता. त्याचे गत नऊ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पत्नीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम २१ रोजी सायंकाळी होणार होता. या कार्यक्रमासाठी बहिणीला घेऊन तो अमळनेर येथून २० रोजी रात्री घरी परतला होता.
अमळनेरहून बोदवडला घरी परतला. २० रोजी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर तो झोपला. दुसऱ्या दिवशी घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याने कुटुंबीय कामात, तर घरी पाहुण्यांची लगबग होती. बराच वेळ होऊनही प्रवीण उठला नाही. यामुळे त्याची पत्नी व आई पाहण्यासाठी खोलीत गेले. तेव्हा तो पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर घरातील मंडळींनी दरवाजा तोडून त्याला काढले. तोपर्यंत तो गत प्राण झालेला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
या घटनेने संपूर्ण कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे, तर पत्नीवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, बहिण व भाऊ आहे.

Web Title: Suicide by taking a youth in Bodwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.