जैनाबादमध्ये तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
By admin | Published: January 12, 2017 12:32 AM2017-01-12T00:32:34+5:302017-01-12T00:32:34+5:30
जळगाव : वाल्मिक नगरातील जैनाबादमध्ये मोहन रवींद्र सपकाळे (वय 24) या तरुणाने बुधवारी सकाळी साडे दहा वाजता राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
जळगाव : वाल्मिक नगरातील जैनाबादमध्ये मोहन रवींद्र सपकाळे (वय 24) या तरुणाने बुधवारी सकाळी साडे दहा वाजता राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मोहन हा बांधकामावर मजुरीचे काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते.
वडील महापालिकेत पाणी पुरवठा विभागात नोकरीला आहेत. बुधवारी ते डय़ुटीवर होते तर मोठा भाऊ अनिल हा बाहेर गेलेला होता. आई ललिताबाई ही अंगणात बसलेली होती. अकरा वाजता आई घरात गेली असता रवींद्र याने झोक्याच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजा:यांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनी पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी उपनिरीक्षक प्राची राजूरकर व हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे यांना घटनास्थळी रवाना केले. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अविवाहित असलेला रवींद्र हा दारुच्या आहारी गेला होता, त्यामुळे त्यातूनच त्याने हा निर्णय घेतला असावा असा अंदाज वर्तविला आहे.