रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:47 PM2019-09-17T22:47:40+5:302019-09-17T22:47:59+5:30
जळगाव - सकाळी घराबाहेर निघालेल्या महिलेने आशाबाबानगर परिसरातील रेल्वेपुलावर धावत्या रेल्वेसमोर स्वत: ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ...
जळगाव- सकाळी घराबाहेर निघालेल्या महिलेने आशाबाबानगर परिसरातील रेल्वेपुलावर धावत्या रेल्वेसमोर स्वत: ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ धनश्री पंकज वसाने (२६, रा़ आशाबाबानगर) असे मयत महिलेचे नाव आहे़ दरम्यान, महिलेचा मृतदेह हा चार तास जागेवरच पडून होता़ मुलीचा शोध घेत असताना पुलावर काय गर्दी आहे, हे पाहण्यासाठी गेलेल्या वडीलांना मुलीचाच मृतदेह आढळून आल्यामुळे त्यांनी एकच आक्रोश केला़
आशाबाबा नगरात श्रीराम राजाराम चौधरी हे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत़ ते विद्यापीठातील कर्मचारी आहेत़ दरम्यान, त्यांची मुलगी धनश्री हिचे पंकज वसाने यांच्याशी लग्न झाले होते़ परंतू, काही वर्षानंतर पंकज यांचे निधन झाल्यामुळे धनश्री या वडीलांकडे आशाबाबानगरात राहत होत्या़ मात्र, काही महिन्यांपासून त्या मानसिक आजारात होत्या़ मंगळवारी सकाळी श्रीराम चौधरी हे ड्युटीसाठी निघून गेले तर त्यांच्या पत्नी सुध्दा बाहेर गेल्या होत्या़ त्याचदरम्यान, धनश्री या घराबाहेर निघाल्या़ काहीवेळानंतर आशाबाबानगर रेल्वे पुलावर त्यांनी रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली़
नागरिकांना हटकले़़़
दरम्यान, धनश्री वसाने या रेल्वे रूळाजवळ फिरत असताना नागरिकांना ते हटकले होते़ त्यामुळे त्या काही अंतर आणखी पुढे चालत गेल्या़ त्यानंतर घटना घडली़ डोक्याला व शरिराला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला़ कुणीतरी आत्महत्या केल्यामुळे नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली़ त्यामुळे बघ्यांची गर्दी झालेली होती़
आणि मुलगी दिसली मृतावस्थेत
मुलगी धनश्री ही कुठतरी निघून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर वडील श्रीराम हे दुपारपासून तिचा शोध घेत होते़ अखेर सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना आशाबाबानगर पुलाजवळ काही तरी घटना घडली अशी माहिती मिळाली़ त्यांनी त्वरित त्याठिकाणी धाव घेतली़ अन् त्यांना रेल्वेच्या धक्कयामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे दिसले़ जागेवरच हंबरडा फोडत काहीवेळानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली़
चार तास मृतदेह पडून
दुपारी साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास घटना घडल्यानंतर लोहमार्ग व रामानंदनगर पोलिसांना माहिती न मिळाल्यामुळे तब्बल ४ चार मृतदेह जागेवर पडून होता़ अखेर सायंकाळी मयत महिलेच्या वडीलांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेले़
यापूर्वीही त्या निघाल्या होत्या घरून
धनश्री ह्याआॅगस्ट महिन्यात सुध्दा घरातून बाहेर निघून गेल्या होत्या़ त्याबाबत वडील श्रीराम चौधरी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद केली होती़ मात्र, दोन दिवसानंतर त्या पुन्हा घरी परतल्यानंतर चौधरी यांना त्यासंदर्भांत पोलिसांना कळविले होते, अशी माहिती मयत महिलेच्या वडीलांनी दिली़