भुसावळ शहरात तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 15:41 IST2021-03-31T15:40:22+5:302021-03-31T15:41:35+5:30
चांदमारी चाळ भागातील तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली.

भुसावळ शहरात तरुणीची आत्महत्या
ठळक मुद्देराहत्या घरीच घेतला गळफास.
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : शहरातील चांदमारी चाळ भागातील १९ वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली.
२९ रोजी सायंकाळी ७:४५ वाजता ही घटना घडली. पूजा दीपक आव्हाड (१९, आरबीआय, ७२५/चांदमारी चाळ) असे मयत तरुणीचे नाव आहे. तरुणीने राहत्या घरी ओढणीने छतास गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात सतीश रामराव आव्हाड यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय कंखरे करीत आहेत