पाचोऱ्यात क्वारंटाईन सेंटरमध्ये तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:13 PM2020-07-21T12:13:17+5:302020-07-21T12:13:33+5:30
जळगाव : पाचोºयातील साईमोक्ष क्वारंटाईन सेंटरमध्ये मध्यरात्री बांबरुड (राणीचे) येथील ३३ वर्षीय तरूणाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी ...
जळगाव : पाचोºयातील साईमोक्ष क्वारंटाईन सेंटरमध्ये मध्यरात्री बांबरुड (राणीचे) येथील ३३ वर्षीय तरूणाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे़ विनोद रमेश कोकणे असे मयताचे नाव आहे.
विनोद हा रविवारपासून क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झाला होता, त्याचे सोमवारी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते़ मात्र, स्वॅब तपासणी अहवाल अद्याप येणे बाकी होते़ मात्र, सोमवारी मध्यरात्री विनोद याने क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली़ ही घटना रात्री उघडकीस येताच रात्री ३.३० च्या सुमारास प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे ,डॉ.अमित साळुंखे यांनी भेट देत पाहणी केली. विनोद याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे़ दरम्यान, विनोद याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे़ परंतु, या दुर्दवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विनोद हा घरातील आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असल्याने कर्ता पुरुष होता़ तो शेती काम करायचा़ त्याच्या या दुदैर्वी घटनेमुळे बाबरुंड राणिच्या गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, पाच वर्षाची मुलगी, दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.