योगेश्वरनगरात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:59+5:302021-04-16T04:14:59+5:30
जळगाव : योगेश्वरनगरातील ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ ...
जळगाव : योगेश्वरनगरातील ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मनोहर शेनफडू माळी (३८, रा. का. उ. कोल्हे शाळेजवळ, योगेश्वरनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
योगेश्वरनगरातील मनोहर माळी हे मोलमजुरी करून कुटुंबीयाचा उदरनिर्वाह करायचे. मंगळवारी रात्री कुटुंबीयांसह जेवण करून ते झोपले. त्यानंतर मध्यरात्री त्यांनी घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मनोहर यांनी गळफास घेतल्याचे दिसताच, कुटुंबीयांनी लागलीच त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भोळे यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी डॉ. भोळे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. मनोज इंद्रेकर करीत आहेत.