जिल्ह्यात 15 महिन्यांत 195 शेतक:यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 11:52 AM2017-03-30T11:52:30+5:302017-03-30T11:52:30+5:30

शेतक:यांच्या कजर्माफीची मागणी होत असताना 15 महिन्यात जिल्ह्यातील 195 शेतक:यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे.

Suicides of 195 farmers in the district in 15 months | जिल्ह्यात 15 महिन्यांत 195 शेतक:यांच्या आत्महत्या

जिल्ह्यात 15 महिन्यांत 195 शेतक:यांच्या आत्महत्या

Next

 कजर्माफी राहिली दूर, बळीराजाचाच बळी : 109 प्रकरणे अपात्र, मदत कशी मिळणार?

जळगाव,दि.30- राज्यात शेतक:यांना कजर्माफी मिळण्याची मागणी होत असताना कजर्माफी मिळणे तर दूरच देशाचा खरा पोशिंदा असलेल्याचाच बळीराजाचा बळी जाण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मदतीसाठीचे निम्म्याहून अधिक प्रस्ताव अपात्र ठरत असल्याने मृत्यूनंतरही बळीराजाच्या कुटुंबाची उपेक्षा सुरूच आहे. 
 निसर्गाचा लहरीपणा, नापिकी, कजर्बाजारीपणा याला कंटाळून जिल्ह्यामध्ये 15 महिन्यात तब्बल 195 शेतक:यांनी आत्महत्या केल्या.  शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे  109 प्रस्ताव अपात्र ठरले आहे तर 26 प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे.
 सप्टेंबर महिन्यात जास्त आत्महत्या
वर्षभरातील आत्महत्येची संख्या पाहिली तर सप्टेंबर 2016 या महिन्यात जास्त (27) आत्महत्या झाल्या आहेत. पेरणीसाठी कजर्, बियाणे घेतल्यानंतर काढणीचा हंगाम असलेल्या याच काळात पीक हाती आले नाही तर आत्महत्या होतात, असा एक अंदाज व्यक्त केला जातो. 
 शेतकरी आत्महत्येनंतर वारसांना मदतीची घोषणा करण्यात आली होती. जिल्ह्यातील 195 मदतीच्या प्रस्तावातून या समितीने तब्बल 109 प्रस्ताव अपात्र ठरविले आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही या शेतक:यांच्या वारसाची शासनाकडून उपेक्षा कायम आहे.
तीन वर्षात वाढले आत्महत्येचे प्रमाण
गेल्या तीन वर्षापासून दुष्काळीस्थिती आणि अवकाळी पाऊस झाल्याने बळीराजा पार कोलमडला होता. त्यातच तीन वर्षापासून आत्महत्येच्या प्रमाणात जास्त वाढ झाली. 2013 मध्ये 92 शेतक:यांनी आत्महत्या केल्या होत्या. 2014 मध्ये त्यात वाढ होऊन हा आकडा 174 र्पयत पोहचला. 2015 मध्ये 136शेतक:यांनी आत्महत्या केली आणि 2016 मध्ये  हा आकडा तब्बल 171 वर पोहचला.   जानेवारी 2017 ते 20 मार्च 2017 या तीन महिन्यात 24 शेतक:यांनी आत्महत्या केल्या. या तीन महिन्यात हा आकडा वाढतच गेला असून जानेवारीमध्ये सहा जणांनी आत्महत्या केल्या त्यानंतर फेब्रुवारी मध्ये सात आणि मार्चमध्ये 11 जणांनी मृत्यूला कवटाळले. 
 
वर्षनिहाय झालेल्या शेतकरी आत्महत्या
वर्षआत्महत्या      मदतीस पात्र    अपात्र
2013     9256      36
2014    17476      98
2015    13616      81  
2016    17158      108
2017      24 2          1 
(29 मार्चर्पयत)

Web Title: Suicides of 195 farmers in the district in 15 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.