ममुराबादच्या तरुण शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 04:13 PM2017-10-15T16:13:23+5:302017-10-15T16:15:39+5:30
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व अन्य खासगी बॅँकाचे १२ लाखाच्यावर असलेले कर्ज, शेतकरी कर्जमाफीबाबत न होणारा निर्णय व त्यातच पिकांचे नुकसान या साºया बाबींना कंटाळून तुषार लक्ष्मण ढाके (वय ३५ रा.ममुराबाद, ता.जळगाव ह.मु.पारख नगर, जळगाव) यांनी रविवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१५: विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व अन्य खासगी बॅँकाचे १२ लाखाच्यावर असलेले कर्ज, शेतकरी कर्जमाफीबाबत न होणारा निर्णय व त्यातच पिकांचे नुकसान या साºया बाबींना कंटाळून तुषार लक्ष्मण ढाके (वय ३५ रा.ममुराबाद, ता.जळगाव ह.मु.पारख नगर, जळगाव) यांनी रविवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, तुषार ढाके हे गेल्या ११ वर्षापासून बांभोरी येथील जैन कंपनीत टेक्नीशियन या पदावर कार्यरत होते. जैन कंपनीत नोकरीला असल्याने ते पारख नगरात राहायला होते. कंपनीत काम करुन ममुराबाद येथे शेतीचे कामकाज सांभाळायचे. विविध सहकारी सोसायटी व एका खासगी बॅँकेचे त्यांच्याकडे बारा लाखाचे कर्ज होते. शेतीतून उत्पादन कमी होत असताना यंदाही पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढत चालला होता,अशी माहिती तुषार यांचे चुलत भाऊ यतीन ढाके यांनी दिली.
पत्नी घराबाहेर जाताच घेतला गळफास
रविवारी सकाळी पावणे नऊ वाजता पत्नी धनश्री, मुलगी हास्य (वय ७) व मुलगा तनय (वय ५.५) बाहेर गेले होते. पंधरा मिनिटांनी पत्नी लागलीच परत आल्या असता घराचा दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता तुषार यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जागेवर पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.