जळगाव तालुक्यातील भादलीच्या तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:47 PM2018-11-11T12:47:57+5:302018-11-11T12:51:56+5:30

तालुक्यातील भादली बु. येथील प्रशांत रामचंद्र अत्तरदे (वय ३३) या तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Suicides under the fast running train of Bhadli youth in Jalgaon taluka | जळगाव तालुक्यातील भादलीच्या तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव तालुक्यातील भादलीच्या तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

Next
ठळक मुद्दे कारण अस्पष्ट  जळगाव खुर्द शिवारात आढळला मृतदेहशनिवारपासून होता गायब

जळगाव : तालुक्यातील भादली बु. येथील प्रशांत रामचंद्र अत्तरदे (वय ३३) या तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव खुर्द शिवारातील रेल्वे रुळावर खांब क्र.४३३/१९ ते २१ च्या दरम्यान तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती स्टेशन प्रबंधकांकडून मिळाल्यानंतर लोहमार्ग व नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. उपनिरीक्षक जी.आर.हिवरकर व सहका-यांनी प्रशांत याच्या संशयास्पद मृत्यूबाबत चौकशी केली, मात्र ठोस माहिती मिळाली नाही.
शनिवारी कामाला गेला परत आलाच नाही
प्रशांत हा गोदावरी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील लॉन्ड्री विभागात कामाला होता. शनिवारी सकाळीच तो कामाला गेला होता. रात्री घरी परत आलाच नाही. बºयाचदा रात्रपाळीची ड्युटी करीत असल्याने आजही तो रात्रपाळीलाच असावा म्हणून कुटुंबानेही त्याची चौकशी केली नाही. रविवारी त्याचा मृतदेह आढळल्याची माहितीच कुटुंबाला मिळाली. प्रशांत हा विवाहित असून पश्चात पत्नी कुंदा, दोन मुली, वडील रामचंद्र काशिनाथ अत्तरदे, आई हिराबाई व मोठा भाऊ विनोद असा परिवार आहे. प्रशांतच्या या घटनेबाबत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Web Title: Suicides under the fast running train of Bhadli youth in Jalgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.