कु-हाडदे येथे तरुण शेतक-याची आत्महत्या, शेतात घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:19 PM2018-01-11T12:19:49+5:302018-01-11T12:22:25+5:30
नऊ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 11- शेतात गुरांना चारा टाकून येतो, असे कुटुंबियांना सांगून घराबाहेर पडलेल्या भरत महारु पाटील (वय 28, रा.कु:हाडदे, ता.जळगाव) या तरुण शेतक:याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री कु:हाडदे शिवारात घडली. भरत याचा नऊ महिन्यापूर्वीच विवाह झालेला होता. कर्जबाजारीपणामुळे भरत याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
भरत याने मंगळवारी रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर शेतात गुरांना चारा टाकून येतो, असे सांगून शेताचा रस्ता धरला. शेतात गेल्यानंतर त्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. कुटुंबिय शेतात गेले असता हा प्रकार लक्षात आला. त्याला जिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. काही महिन्यापूर्वी कंपनीतील कामाच्या पैशातून त्याने दोन म्हशी घेतल्या होत्या. बुधवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.