सुजय विद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:13 AM2021-01-04T04:13:59+5:302021-01-04T04:13:59+5:30
जैन माध्यमिक विद्यालय कै. मातोश्री प्रेमाबाई जैन प्राथमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे शिक्षक अविनाश महाजन यांच्या ...
जैन माध्यमिक विद्यालय
कै. मातोश्री प्रेमाबाई जैन प्राथमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे शिक्षक अविनाश महाजन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. यशस्वितेसाठी मोहिनी चौधरी, रूपाली वानखेडे, अर्चना धांडे, धनश्री फिरके, लीना नारखेडे, रोहिणी सोनवणे, नरेश कोळी, दीपक भोळे आदींनी परिश्रम घेतले.
राज विद्यालय
येथील राज प्राथमिक विद्यालयात व डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेज येथे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर जयश्री महाजन यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन सुशील सुरवाडे यांनी तर आभार संदीप खंडारे यांनी मानले.
जनक्रांती मोर्चा
महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा व छावा मराठा युवा महासंघातर्फे सावित्रीबाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, रमेश सोनवणे, ॲड. राजश्री भालेराव, मंगला सोनवणे, तेजस्विनी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रिद्धी- जान्हवी फाउंडेशन
दाणाबाजार येथील दत्त मंदिराजवळ रिद्धी -जान्हवी फाउंडेशनतर्फे संस्थापक चित्रा मालपाणी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे चंदन पाटील, किरण कोलते, सतीश दायमा, पद्मावती राणा, कीर्ती राणा, निशा पाटील, संगीता दायमा उपस्थित होते.
दर्जीतर्फे फाउंडेशन
दर्जी फाउंडेशनमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला प्रा. गोपाल दर्जी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर त्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.