उन्हाळ्याचे चटके, टंचाईच्या झळा!
By admin | Published: March 22, 2016 12:49 AM2016-03-22T00:49:42+5:302016-03-22T00:49:42+5:30
धुळे : शहरातील नगावबारी परिसरात असलेल्या सैनिक वसाहतीतील नागरिकांना गेल्या 15 वर्षापासून पाणीटंचाईच्या झळांना तोंड द्यावे लागत आह़े
धुळे : शहरातील नगावबारी परिसरात असलेल्या सैनिक वसाहतीतील नागरिकांना गेल्या 15 वर्षापासून पाणीटंचाईच्या झळांना तोंड द्यावे लागत आह़े या परिसरात जलवाहिन्याच नसल्याने पाणी घरार्पयत कधीच येत नाही़ त्यामुळे नागरिकांना पदरमोड करून टँकर मागवावे लागतात़ नगावबारी परिसरात आग्रा रोडलगत बहुतांश अतिक्रमण झाले आह़े या अतिक्रमित भागाला मनपाच्या तापी योजनेच्या जलवाहिनीवरून सहजगत्या पाणी मिळत़े मात्र आतल्या भागात असलेल्या सैनिक वसाहतीला पाण्यासाठी प्रचंड भटकंती करावी लागत़े सध्या वलवाडी शिवारात येणारा हा भाग शहर हद्दवाढीनंतर धुळे मनपाच्या अखत्यारित येईल. त्यानंतर या भागाला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान मनपासमोर उभे राहणार आह़े सैनिक वसाहत व परिसरात 111 प्लॉट असून त्यापैकी 80 टक्के लोकांनी बांधकामे केली आहेत़ सदरची वसाहत टेकडीवर वसली असल्याने खडकाळ भाग अधिक प्रमाणात आह़े त्यामुळे विहिरी, बोअरवेल व हातपंपांनादेखील पाणी लागत नाही़ त्यामुळे नागरिकांना 400 रुपये खर्चून खासगी टँकर मागवावे लागतात़ लहान कुटुंबांना महिन्याला किमान दोन टँकर लागतात. त्याचप्रमाणे दुचाकी व सायकलवर मनपा जलकुंभावरून पाणी आणावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितल़े सैनिक वसाहतीला मिळणा:या निधीतून या ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आला आह़े परंतु जलवाहिन्याच नसल्याने त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही़ जलवाहिन्यांसाठी आणण्यात आलेले पाईप रस्त्यावर धूळखात पडून आह़े ही परिस्थिती केवळ सैनिक वसाहतीतच नसून मनपा क्षेत्रात येणा:या आजूबाजूच्या कॉलन्यांमध्येदेखील आह़े त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ नियमित कर भरूनही पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याचे नागरिक म्हणाल़े