यावल येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सुंदरकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:27 PM2019-01-02T17:27:51+5:302019-01-02T17:29:04+5:30

यावल येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमात सोमवारी सायंकाळी सुंदरकांड झाले. येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे.

Sundar Kandh at Pranprittitha ceremony at Yaval | यावल येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सुंदरकांड

यावल येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सुंदरकांड

googlenewsNext
ठळक मुद्देमूर्तीची जलाधिवास, धान्याधिवास, पुष्पाधिवास, शय्याधिवास व सायंपूजनआस्था सुंदरकांड व संगीतमय सुंदरकांड ग्रुपतर्फे सादरीकरण

यावल, जि.जळगाव : येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमात सोमवारी सायंकाळी सुंदरकांड झाले. येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे.
सकाळी दहा ते सायंकाळी पाचचे दरम्यान धार्मिक विधी, मूर्तींची जलाधिवास, धान्याधिवास, पुष्पाधिवास, शय्याधिवास व सायंपूजन आदी विविध कार्यक्रम आटोपून सायंकाळी सातला सुंदरकांड झाले.
येथे उभारण्यात आलेल्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात मूर्ति प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी भुसावळ येथील 'आस्था सुंदरकांड ' ग्रुपतर्फे संगीतमय सुंदरकांड व सुमधूर भजनाचा कार्यक्रम झाला. येथे शहरात पूर्ण अर्थ नगरात तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आस्था सुंदरकांड ग्रुपचे मुख्य संचालक संजय मंत्री तथा सुरीले भजन सम्राट सुनील लाहोटी, ढोलवादक लालाजी महाराज, झांजवादक रामा पठाडे तथा सुनील भादुपोता तसेच सुमधूर शंखनाद शुभांगी झोपे, भजन गायिका निर्मला चौधरी, माणिक चौधरी, घनश्याम टेमाणी, हेमंत मालवीय, प्रमोद भोळे, गोकुळ सरोदे, विलास पवार, संजय मुणोतकर, देवेंद्र अग्रवाल, संजय पालक, अशोक पालक, विनोद राठोड, पंकज झोपे, उमेश कासार, अशोक बेंडाळे, दुबेजी, दत्तू पाटील, मदन जोशी, सतीश पाटील, दिलीप पाटील, साधना सरोदे, सुचिता मंत्री, स्वाती पठाडे, मंगला भोळे, अर्चना कासार, ढाके, इंदू पठाडे, रवी वर्मा, अशोक बेंडाळे, विजया बेंडाळे यांनी सुंदरकांड सादर करून भाविकांची दाद मिळवली.

 

Web Title: Sundar Kandh at Pranprittitha ceremony at Yaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.