रविवारी मुंबईला गेले ५८ प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:35+5:302021-02-15T04:15:35+5:30
कोरोनामुळे जळगावहून मुंबईसाठी आठवड्यातून एकदाच सेवा सुरू आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेकायदा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर बंदी ...
कोरोनामुळे जळगावहून मुंबईसाठी आठवड्यातून एकदाच सेवा सुरू आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बेकायदा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर बंदी घालण्याची मागणी
जळगाव : रेल्वेत अधिकृत परवानाधारक विक्रेत्यानांच खाद्यपदार्थ विक्रेत्यांची परवानगी देण्यात आली आहे. असे असतांना रेल्वेत जळगाव ते मनमाड दरम्यान अनेक विक्रेते
बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विक्री करत आहेत. तसेच त्यांच्याकडील खाद्यपदार्थ सुरक्षितही नसल्यामुळे, प्रवाशांच्या आरोग्यवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई नाहीच
जळगाव : रेल्वे रूळ ओलांडणे हे कायद्याने गुन्हा असण्याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, कायदा मोडणाऱ्यांवर कुठलिही कारवाई केली,
जात नसून प्रवाशी बिनधास्तपणे रूळ ओलांडून स्टेशनच्या बाहेर ये-जा करित आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांवर कारवाईची मागणी होत आहे.
तहसीलजवळ तात्पुरता स्कायवॉक उभारण्याची मागणी
जळगाव : सद्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे, नागरिकांना तहसील कार्यालयाजवळून रेल्वे रूळ ओलांडून शिवाजीनगरकडे ये-जा करावी लागत आहे.
विशेष म्हणजे नागरिकांना जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम होईपर्यंत तात्पुरता स्कायवॉक उभारण्याची मागणी
नागरिकांमधून केली जात आहे.
बार्शी कॉलनीत बसविले पथदिवे
जळगाव : शिवाजीनगरातील बार्शी कॉलनीत अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने, नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या
तक्रारींची दखल घेत दारकुंडे यांनी या परिसरात सर्व ठिकाणी पथदिवे बसविले आहेत. यामुळे नागरिकांचा रात्रीच्या वेळी प्रवास करण्याचा त्रास वाचला आहे.