रोगप्रतिकारक शक्ती द्रव्याचे रविवारी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:17+5:302021-06-19T04:12:17+5:30
आरोग्य शिबिरासाठी नाव नोंदणीचे आवाहन जळगाव : शिवसेना वैद्यकीय शाखेतर्फे ठाणे येथे `प्लॅटिनम` रूग्णालयात मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन ...
आरोग्य शिबिरासाठी नाव नोंदणीचे आवाहन
जळगाव : शिवसेना वैद्यकीय शाखेतर्फे ठाणे येथे `प्लॅटिनम` रूग्णालयात मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जुलै पर्यंत हे शिबिर राहणार असून, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनाही याचा लाभ घेता येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी स्व. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे शहर समन्वयक जितेंद्र गवळी व भावेश ढाके यांच्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सेवाग्राम एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या एक महिन्यापासून रेल्वे प्रशासनाने मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस बंद केला आहे. यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना जळगावहून मध्यरात्री असलेल्या विदर्भ एक्सप्रेसने नागपूरकडे जावे लागत आहे. विशेष म्हणजे सेवाग्राम रद्दमुळे विदर्भ एक्सप्रेसला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सेवाग्राम एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.
नवीन दादऱ्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्टेशनवर उभारण्यात आलेल्या नवीन दादऱ्यावर नुकतेच सीसीटीव्ही बसविले आहे. या दादऱ्याचे उद्घाटन अद्याप झाले नसले तरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. तसेच स्टेशनवरील सीसीटीव्ही कक्षामध्येही स्वतंत्र पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकंदरीत या यंत्रणेमुळे स्टेशचा सर्व परिसर आता सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आला आहे.
विक्रेत्यांमुळे शिवतीर्थ मैदानावर अस्वच्छता
जळगाव : शहरातील शिवतीर्थ मैदानावर मनपातर्फे गेल्या महिन्यापासून शहरातील भाजीपाला विक्रेत्यांनाही व्यवसायाची परवानगी दिली आहे. मात्र, हे व्यावसायिक उरलेला नाशवंत माल जागेवरच टाकून देत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. यामुळे सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरीकांमधून केली जात आहे.