संडे स्पेशल मुलाखत_ आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्री_ आदिवासी, अहिराणी साहित्यिक सुनील गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 12:09 AM2020-11-15T00:09:00+5:302020-11-15T00:12:58+5:30

मराठी साहित्य प्रवाहात आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्रि असून ते वास्तवाचे प्रश्न मांडण्यात व बोलीभाषा संवर्धनासाठी यशस्वी ठरत आहे

Sunday Special Interview_ The Role of Tribal Literature Humanity Center | संडे स्पेशल मुलाखत_ आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्री_ आदिवासी, अहिराणी साहित्यिक सुनील गायकवाड

संडे स्पेशल मुलाखत_ आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्री_ आदिवासी, अहिराणी साहित्यिक सुनील गायकवाड

googlenewsNext
ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तीशी थेट संवादबोलीभाषा संवर्धनासाठी महत्वपूर्ण भूमिका

प्रमोद ललवाणी
कजगाव, ता.भडगाव : मराठी साहित्य प्रवाहात आदिवासी साहित्याची भूमिका मानवता केंद्रि असून ते वास्तवाचे प्रश्न मांडण्यात व बोलीभाषा संवर्धनासाठी यशस्वी ठरत असल्याचे आदिवासी अहिराणी साहित्यिक सुनील गायकवाड यांनी ह्यलोकमतह्णला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
२०१९ हॆ संयुक्त राष्ट्र संघटना युनोने जागतिक आदिवासी बोली भाषा वर्षं जाहीर केले होते. कारण पृथ्वी तलावरील बऱ्याच बोली भाषा नष्ट झाल्या. विशेष करून आदिवासी बोली यात आपल्या खान्देशातील ३८ आदिवासी बोलींचा मृत भाषेत समावेश होतो. त्यामुळे गेल्या वर्षी "बाडगीनी धार" हॆ आत्मकथन भिलाऊ बोलीत प्रकाशन करण्याचे धाडस केले. या बोलीतील ते पहिले आत्मकथनात्मक पुस्तक आहे. सुनील गायकवाड हे ग्रामीण, आदिवासी साहित्यातील व बोलीभाषा साहित्यातील महत्वाचं नाव. त्यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : आदिवासी बोलीभाषा संवर्धनाविषयी काय सांगू शकाल?
उत्तर : मी बोलीभाषा प्रमाणिकरण समिती म. रा .शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण समिती पुणे वर २०१४ ते २०१५ या कालावधीत काम केले. पण त्यानंतरही आजपर्यत मी वैयक्तिकरित्या काम करतोय. भिलाऊ, तडवी, अफाण बोली, पावरी, मावची, धानका, डोंगरी या बोलीचे संवर्धन सुरू आहे. त्याकरिता आदिवासी साहित्य संमेलन आम्ही ग्रामीण वस्ती, पाडा, गावं, मोहल्लापर्यत नेतोय.
प्रश्न : आपल्या लिखानाची प्रेरणा कोणती सांगाल?
उत्तर : मी ग्रामीण भागातील जीवन जगतोय आणि जगत आलोय. माझे साहित्य काल्पनिक नाही. वास्तव जीवन जगलो तेच साहित्याचे विषय ठरले. ग्रामीण भागातील माणसे मग आवडत्या म्हणजे सालदार असो शेतकरी वा ग्रामीण व्यवस्था त्यांची दुःख, वेदना, जखमा, चांगल्या बाजू माझे साहित्य बनतात तीच माझी लेखन प्रेरणा.
प्रश्न : आपले साहित्यात व साहित्य संमेलनात काही योगदान?
उत्तर : मला माझ्या साहित्याने ओळख निर्माण करून दिली. मी कोणत्याही लेखकाचे अणुकरण केले नाही आणि करणार नाही. यामुळे पाचवे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन वडजी, ता.भडगाव, जि. जळगाव संमेलनाध्यक्ष म्हणून २०१९ ला निवड झाली होती. तसेच खान्देश हित संग्राम आयोजित कल्याण येथील आहिराणी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून योगदान देता आले. शिवाय आदिवासी बोलीकरिता जे. एन. यू. विद्यापीठ दिल्ली येथे कथाकार म्हणून कथाकथनाची भूमिका पार पाडली. ही कथा भारत सरकारच्या साहित्य अकादमी, नवी दिल्लीने आदिवासी कहानियां यात गेल्या वर्षी प्रकाशित केली.
प्रश्न : बोलीभाषेसाठी सध्या काय काम सुरू आहे?
उत्तर : आदिवासी व बोलीतील साहित्यिकांचे साहित्य एकत्रित करून बोलीतील आदिवासी साहित्य खंड तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच अखिल भारतीय पातळीवर आदिवासी साहित्यिकांची साहित्य सूची व साहित्य परिचय या ग्रंथाचे काम सुरू आहे. याशिवाय आदिवासी साहित्य अकादमीमार्फत दरवर्षी साहित्य संमेलन घेऊन बोलीभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रश्न : आपण एक उत्तम शिक्षक आहात. यात या उपक्रमात विद्यार्थी असतो का? विद्यार्थी कवी निर्माण झाले?
उत्तर : साहित्य हॆ अनुभवाने जन्म घेते. तरी माझ्या कजगाव शाळेतून किरण हिरे हा नवोदित कवी तयार झाला. तसेच लोकेश पाटील, रोहन खैरनार, राजेश पाटील हॆ विद्यार्थी राज्यस्तरीय विद्यार्थी संमेलनात गाजले.

 

 


 

 

Web Title: Sunday Special Interview_ The Role of Tribal Literature Humanity Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.