पाचोरा पीपल्स को आॅप बँकेची रविवारी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:08 AM2020-01-11T01:08:44+5:302020-01-11T01:10:09+5:30
पाचोरा पीपल्स को.आॅप.बँकेची १२ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
पाचोरा, जि.जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यात विस्तार असलेल्या दि पाचोरा पीपल्स को.आॅप.बँकेची १२ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत होत असून, कोण बाजी मारतो हे मतदानानंतरच ठरणार आहे. बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत १५ जागांसाठी एकूण ३२ उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वसाधारण गटात पॅनल उमेदवारांशिवाय अनिल येवले व विलास अहिरे या २ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असून, उर्वरित जागांसाठी सरळ लढत होणार आहे.
सर्वसाधारण मतदारसंघाच्या १० जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात असून माजी चेअरमन अशोक संघवी यांच्या नेतृवातील पॅनलमध्ये अशोक संघवी यांच्यवसह चंद्रकांत लोडाया, अल्पेश संघवी, सुभाष राका, सुशील मराठे, डॉ.जाकीर देशमुख, चंद्रकांत येवले, किशोर संचेती, शरद पाटील, सुरेंद्र बाफना हे तर अतुल संघवी यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या पॅनलमध्ये अतुल संघवी यांच्यासह प्रशांत अग्रवाल, जीवन जैन, देवेन कोटेचा, अनिल बोहरा, शरद पाटे, स्वप्नील पाटील, प्रकाश पाटील यांच्यात लढत होणार आहे .
इतर मागास प्रवर्ग मतदार संघाच्या १ जागेसाठी सुभाष नावरकर व भागवत महालपुरे यांच्यात सरळ लढत होईल. महिला राखीव मतदारसंघाच्या २ जागांसाठी तारा देवरे, विद्याब् पाटील, डॉ.अस्मिता पाटील, मयुरी बिल्दीकर यांच्यात लढत होत आहे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून प्रवीण ब्राह्मणे व अविनाश भालेराव यांच्यात सरळ लढत होत आहे. भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून राजेंद्र राठोड व विकास वाघ यांच्यात लढत होत आहे .मागीलवर्षी सत्ताधारी ८ संचालकांनी चेअरमन अशोक संघवींविरुद्ध बंड करून राजीनामे दिल्याने अल्पमतातील सत्ता बरखास्त होऊन प्रशासक नियुक्त झाले. वर्षभरानंतर निवडणूक लावण्यात आली. यामुळे साऱ्या तालुक्याचे लक्ष ह्या निवडणुकीकडे लागून आहे.
१२ जानेवारी रोजी होणार मतदान आहे. पाचोरा येथे गो से हायस्कूलमध्ये मतदान होत असून नगरदेवळा, शेंदुर्णी, जामनेर, जळगाव, भडगाव ह्या ठिकाणी मतदान होत असूनश एकूण ९ हजार ६१० सभासद मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.