सासरच्या मंडळीनीच करून दिला सुनेचा पुनर्विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 03:37 PM2020-12-28T15:37:54+5:302020-12-28T15:38:32+5:30

चोपडा तालुक्यात सासरच्या मंडळींनीच आपल्या सुनेचा पुनर्विवाह करून समाजात आदर्श निर्माण केला आहे.

Sune's remarriage was done by her father-in-law's congregation | सासरच्या मंडळीनीच करून दिला सुनेचा पुनर्विवाह

सासरच्या मंडळीनीच करून दिला सुनेचा पुनर्विवाह

googlenewsNext
ठळक मुद्देथाटामाटात करून दिला विवाह.

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा  : पुनर्विवाह व्हावे, अशी सर्वांची इच्छा असते. परंतु पुढाकार कोणी घेत नाही. मात्र चोपडा तालुक्यात सासरच्या मंडळींनीच आपल्या सुनेचा पुनर्विवाह करून समाजात आदर्श निर्माण केला आहे.

मुलींचे प्रमाण कमी असले तरी चांगल्या वधूसाठी चांगला वर मिळणे कठीण झाले आहे तर चांगल्या वरासाठी उत्तम वधू मिळणे फारच कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जो तडजोड करेल त्याचेच विवाह जुळतील, असा अलिखित नियम होऊन गेला आहे. असाच एक आदर्श विवाह चोपडा शहरात पार पडला.

तालुक्यातील विरवाडे येथील व चोपडा शहरातील लव्हली ट्रेलरचे संचालक स्व. सचिन हरकचंद सुराणा याचे जवळपास ३ वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्याची पत्नी रिना नेमीचंद जैन घोडगाव, ता. चोपडा येथील होती. कमी वयातच ती विधवा झाली होती. संपुर्ण आयुष्य कसे निघणार ? या विवंचनेत सासर व माहेरची मंडळी होती. रिनाची सासू लिलाबाई सुराणा याही अगदीं कमी वयातच विधवा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी जीवन जगताना पतीविना पत्नीला काय यातना भोगाव्या लागतात? हे जवळून अनुभवले होते. त्यामुळे चांगला मुलगा मिळाला तर मी माझ्या सुनेचे लग्न लावून देईल, असे त्या नेहमी सांगत होते. त्यांच्या मनातील इच्छा त्यांनी त्यांचे जेठ ताराचंद सुराणा, मोठा मुलगा संदिप सुराणा, भाऊ जवरीलाल कटारिया यांना सांगितली. त्यानुसार त्यांनी मुलगा शोधण्याचे काम केले.

मोहाडी जि. धुळे येथील लखीचंद नेमीचंद छाजेड यांचा मुलगा पुनमचंद ह्याला पसंद केले. मुलालादेखील मुलगी पसंद आली आणि दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता श्री स्वामीं समर्थ पॅलेसमध्ये आदेश बरडीया यांनी जैन पध्दतीने हे लग्न लावले. सासुनेच मुलगी समजून सुनेचा पुनर्विवाह करून दिल्याने उपस्थित मंडळी विशेष कौतुक करत होते. यावेळी आशिर्वाद देण्यासाठी विधानसभा माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, चोपडा पिपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, संचालक नेमीचंद कोचर, संघपती गुलाबचंद देसरडा, पत्रकार लतीश जैन, वधूचे मोठे वडील अशोक सांडेचा, दिलिप सांडेचा, घोडगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील तर वरपक्षाकडून पारसमल छाजेड, अशोकचंद छाजेड हे उपस्थित होते. लग्न जमविण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश छाजेड ,सतिश छाजेड, सुनिल छाजेड, तर वधूपक्षाकडून नेमीचंद सांडेचा, जवरीलाल कटारिया, राजेंद्र सुराणा, संदीप सुराणा यांनी मेहनत घेतली. 

Web Title: Sune's remarriage was done by her father-in-law's congregation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.