सुनील दाभाडे यांच्या चित्राची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:59+5:302021-04-18T04:15:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवसेवा विद्यालयाचे कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी ज्वारीच्या भाकरीवर डॉ.बाबासाहेब ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवसेवा विद्यालयाचे कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी ज्वारीच्या भाकरीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटले होते. या चित्राची मुंबईच्या ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. नुकतेच त्यांना प्रमाणपत्र पाठवून सन्मानित करण्यात आले आहे.
१४ एप्रिल रोजी कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्वारीच्या भाकरीवर चित्र रेखाटून डॉ.बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळेच आज गोरगरिब व गरजू यांना हक्काची भाकरी मिळत असून ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही काय रं...’ असा संदेश दिला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र भाकरीवर साकारण्याचा पहिलाच प्रयोग झाला असून या प्रयोगाची दखल घेण्यात आली आहे. तर कला शिक्षक सुनील दाभाडे यांच्या चित्राची मुंबईच्या बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी रेखाटलेले हे चित्र ''लोकमत''मध्ये प्रसिध्द झाले होते.