चाळीसगावचे सुपुत्र सुनील देशमुख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 07:09 PM2018-07-06T19:09:33+5:302018-07-06T19:10:39+5:30
जळगाव जिल्ह्यात गौरव सोहळ्याचे होणार आयोजन
चाळीसगाव, जि.जळगाव : भारतीय शुगरच्या वतीने दिला जाणारा खासगी साखर कारखानदारीतील २०१८चा मानाचा ‘उत्कृष्ट कार्यकारी संचालक’ पुरस्कार जागृतीचे कार्यकारी संचालक सुनील देशमुख यांना नुकताच जाहीर झाला आहे. १४ रोजी कोल्हापुरात एका विशेष सोहाळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार आहे.
१९८३ मध्ये लातूर येथील विलासराव देशमुख चेअरमन असलेल्या मांजरा सहकारी साखर कारखान्यात ते सिव्हील इंजिनिअर म्हणून रुजू झाले.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन गौरवी देशमुख, व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी देशमुख यांचा सत्कार केला. पुरस्कार वितरणानंतरही त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यस्तरावरील उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार मिळविणारे सुनील देशमुख पहिलेच खान्देशी सुपुत्र ठरणार आहेत.
सुनील देशमुख हे मूळचे चाळीसगाव येथील रहिवासी असून, गेल्या ३५ वर्षांपासून ते लातूर येथील साखर कारखानदारी उद्योगात सक्रिय आहेत.
सद्य:स्थितीत देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अॅड अलाईड इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहे.