राज्यस्तरीय कवी संमेलनाध्यक्षपदी सुनील गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:42+5:302021-06-20T04:12:42+5:30
कजगाव, ता. भडगाव : येथील साहित्यिक तथा कथाकार कवी सुनील गायकवाड यांची दिनांक २० जून रोजी होणाऱ्या ऑनलाइन ...
कजगाव, ता. भडगाव : येथील साहित्यिक तथा कथाकार कवी सुनील गायकवाड यांची दिनांक २० जून रोजी होणाऱ्या ऑनलाइन राज्यस्तरीय मार्मिक कवी संमेलनाध्यक्षपदी नवसर्जनशील साहित्य संघाने निवड केली.
सुनील गायकवाड यांचे भौगऱ्या, गल्लूर, पावरी, कोयता, बाडगिनी धार, भिलाऊ आदिवासी लोकसाहित्य व इतिहास आदी ग्रंथ प्रकाशित झाले असून सुगावा प्रकाशन पुणेमार्फत मासोली ही कादंबरी पुढील महिन्यात प्रकाशित होत आहे. सुनील गायकवाड यांनी कल्याण, वडजी, नाशिक येथील साहित्य संमेलनांचे संमेलनाध्यक्षपद तर बुलडाणा, पाचोरा येथे कवी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे. पुणे येथील साहित्य संघामार्फत सुनील गायकवाड प्रथमच ऑनलाइन राज्यस्तरीय कवी संमेलनाध्यक्षपदी त्यांची निवड परिवर्तनशील ग्रामीण साहित्याचा सन्मान आहे.
या कवी संमेलनात सासवड पुणे येथील साहित्यिक बबनदादा चखाले, डाॅ. मदन देवगावकर, संजय साळुंखे मानवाधिकार सचिव पुणे, लक्ष्मण साळुंखे प्रमुख अतिथी असून बाबा तारे, धनराज गरड, बापू भौग, कवी प्रतीक कांबळे, दिलीप मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीसह महाराष्ट्रातील मान्यवर कवी यात सहभागी होतील. प्रामुख्याने संतोष पावरा नंदुरबार, स्नेहल सोनटक्के, शीतल ढगे यवतमाळ, राहुल निकम सोलापूर, राणी शृंगारे लातूर, प्रक्षा आपेगावकर अंबाजोगाई, औदुंबर भोसले इंदापूर, संजय डोबाडे त्र्यंबकेश्वर, करणसिंग तडवी शहादा, तुषार पाटील जळगाव, प्रशांत गायकवाड, दिलीप कुमार चव्हाण, बापूसाहेब सोनवणे मुंबई, नवनाथ खरात करमाळा, ज्योती लाड बीड, प्रकाश तोटेवाड पंढरपूर, सुरज चौगुले उस्मानाबाद, तर पुणे येथून आनंद गायकवाड, उमा लुकडे, आशाताई शिंदे, चंद्रकांत जोगदंड, आत्माराम हारे, डाॅ. शोभा लोंढे, कविता काळे, योगिता कोठेकर, सुभाष महाराज निमंत्रित कवी आहेत.
===Photopath===
190621\19jal_5_19062021_12.jpg
===Caption===
सुनील गायकवाड