सुपरफास्ट गाड्यांना जळगावला थांबा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:36 PM2019-07-23T12:36:12+5:302019-07-23T12:36:37+5:30

जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामासाठी व शिक्षणासाठी जिल्हाभरातून हजारो नागरिक जळगावला येत असतात. विशेष म्हणजे चाळीसगाव, ...

Superfast trains should be stopped at Jalgaon | सुपरफास्ट गाड्यांना जळगावला थांबा द्यावा

सुपरफास्ट गाड्यांना जळगावला थांबा द्यावा

googlenewsNext

जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामासाठी व शिक्षणासाठी जिल्हाभरातून हजारो नागरिक जळगावला येत असतात. विशेष म्हणजे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या भागातील प्रवाशांची संख्या सर्वांधिक सुरु असते.असे असले तरी, चाळीसगाव व पाचोरा येथे अनेक सुपरफास्ट गाड्यांना थांबा नाही. अलिकडेच महानगरी व सचखंड या गाड्यांना थांबा मिळाला असला तरी, इतरही सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळणे गरजेचे आहे.तसेच दैनंदिन धावणारी देवळाली-भुसावळ पॅसेंजर गेल्यानंतर जळगावला येण्यासाठी दुपारी १२ पर्यंत जळगावला येण्यासाठी एकही गाडी राहत नाही. यामुळे जळगावला येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांचे चांगलेच हाल होतात. त्यामुळे प्रशासनाने पॅसेंजर नंतर मुंबईकडून जळगावकडे जाणाºया एखाद्या सुपरफास्ट गाडीला चाळीसगाव व पाचोरा या ठिकाणी थांबा द्यायला हवा. विशेष म्हणजे यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. चाळीसगाव ते जळगाव हे अंतर जास्त असल्याने वाहनाने येणे शक्य नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन, सकाळची पॅसेंजर गेल्यानंतर मधल्या काळात एखादी गाडी जळगावसाठी सोडणे गरजेचे आहे. दरम्यान, खासदारांनी चाकर मान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, यांच्यासाठी पॅसेंजरला स्वतंत्र डबा जोडणे गरजेचे आहे. यामुळे विशेषत : महिला महिलांचे हाल थांबतील. कारण, अनेकवेळा महिला प्रवाशांना गाडीमध्ये बसायला देखील जागा मिळत नाही.त्यामुळे महिलांना उभे राहुन, प्रवास करावा लागतो. अशा एक ना अनेक समस्या आणि अडचणी आहेत. याबद्दल किती लिहावे, हा पण एक प्रश्नच आहे.
- अविनाश पाटील

Web Title: Superfast trains should be stopped at Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव