सण-उत्सव व निवडणुकांमुळे विशेष काळजी आवश्यक, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या सूचना

By विजय.सैतवाल | Published: October 9, 2023 03:36 PM2023-10-09T15:36:22+5:302023-10-09T15:36:41+5:30

आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांविषयी माहिती घेण्यासह उत्सव काळात बंदोबस्ताच्या आखणीसाठी आवश्यक उपाययोजनांसदर्भांत सूचित करण्यात आले.

Superintendent of Police M.Rajkumar advises special care due to festivals and elections | सण-उत्सव व निवडणुकांमुळे विशेष काळजी आवश्यक, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या सूचना

सण-उत्सव व निवडणुकांमुळे विशेष काळजी आवश्यक, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या सूचना

googlenewsNext

जळगाव : गणेशोत्सव काळात जी काळजी घेण्यात आली, त्याचप्रमाणे आता उपाययोजना आवश्यक आहे. त्यात सण-उत्सवासोबतच ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी विशेष काळजी घेणे आवश्यक असून, त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.

रविवार, ८ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस दलाची बैठक झाली. त्यात नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारी आढावा व उपाययोजना याविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीला पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

बंदोबस्ताची आखणी 

आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांविषयी माहिती घेण्यासह उत्सव काळात बंदोबस्ताच्या आखणीसाठी आवश्यक उपाययोजनांसदर्भांत सूचित करण्यात आले. येत्या काळात त्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात ज्या पद्धतीने काळजी घेण्यात आली, तशीच काळजी आता नवरात्रोत्सव काळातदेखील अपेक्षित असल्याचे पोलिस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.

उत्सव व निवडणुकांची योग्य सांगड आवश्यक

येत्या काळात जिल्ह्यात ज्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका आहेत, त्या ठिकाणी सण-उत्सव काळात योग्य सांगड घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सज्ज राहा, असेही यावेळी सांगण्यात आले. यासोबतच समन्स, वारंट बजावणी व अन्य विषयांचादेखील आढावा घेण्यात आला.

Web Title: Superintendent of Police M.Rajkumar advises special care due to festivals and elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.