समाजाच्या जडणघडणीत ग्रंथपालांचा हातभार - जळगावात ग्रंथपालांच्या राष्ट्रीय परिषदेतील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:57 AM2018-12-01T11:57:06+5:302018-12-01T11:58:04+5:30

पीएच.डी.साठी गाईड म्हणून संधी मिळावी

Support of Librarians in the upliftment of society - Surge of the National Conference of Jalgaon Libraries | समाजाच्या जडणघडणीत ग्रंथपालांचा हातभार - जळगावात ग्रंथपालांच्या राष्ट्रीय परिषदेतील सूर

समाजाच्या जडणघडणीत ग्रंथपालांचा हातभार - जळगावात ग्रंथपालांच्या राष्ट्रीय परिषदेतील सूर

googlenewsNext

जळगाव : ग्रंथपालांचे पदनाम बदल असो की इतर कोणत्याही मागण्या मांडण्यासाठी ग्रंथपालांना महाराष्ट्र युनिर्व्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज लायब्ररियनने (मुक्ला) मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून त्यातून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. विविध प्रश्न मार्गी लागण्यासह ग्रंथपालांना मार्गदर्शक (पीएचडी गाईड) म्हणून संधी दिली तर विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही त्याचा लाभ होऊ शकतो. समाजाच्या जडणघडणीमध्ये या ग्रंथपालांचा हातभार महत्त्वाचा राहिला आहे, असा सूर ग्रंथपालांच्या राष्ट्रीय परिषदेत उमटला.
महाराष्ट्र युनिर्व्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज लायब्ररियनने (मुक्ला), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यावतीने व भारतीय ग्रंथपाल संघाच्या सहयोगाने जळगावात ‘ग्रंथालय आणि माहितीशास्त्र’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे शुक्रवारी सकाळी उद््घाटन झाले.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. पी.पी. माहुलीकर होते तर उद््घाटक म्हणून माजी प्राचार्य अनिल राव उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र युनिर्व्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज लायब्ररियनचे(मुक्ला) अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे, भारतीय ग्रंथपाल संघाचे (आयएलए) महासचिव प्रदीप राय, मुक्लाचे महासचिव डॉ. विनय पाटील, परिषदेचे संचालक डॉ. नंदकुमार दहीभाते, समन्वयक दिलीप देशमुख, डॉ. चंद्रशेखर वाणी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वालव करून परिषदेचे उद््घाटन झाले.
प्रास्ताविक भाषणात डॉ. मोहन खेरडे यांनी ‘मुक्ला’च्या वाटचालीचा आढावा घेत त्याचे कार्य सांगितले. या सोबतच ग्रंथपालांच्या शैक्षणिक उपक्रमांचा माहिती देत ग्रंथालय अभ्यासक्रमाविषयी मत मांडले. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यात बदलसाठी ‘मुक्ला’च्या योगदानाबद्दलही या वेळी माहिती देण्यात आली.
प्रश्न मांडण्यासाठी पुढाकार घेणार - अनिल राव
ग्रंथपालांना सहयोगी अथवा सहायक प्राध्यापक अशा पदनाम बदलाच्या मागणीबाबत बोलताना माजी प्राचार्य अनिल राव म्हणाले की, हा बदल करताना शासनावर आर्थिक भार येणार नाही, हे शासनाला समजून सांगितले पाहिजे. एकरुप परिनियम समिती सदस्य म्हणून यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाहीदेखील प्राचार्य राव यांनी दिली. ग्रंथालयांचा वापर कसा करावा, पुस्तक कसे शोधावे याविषयी माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक शाखेमध्ये पायभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन कोर्स) आवश्यक आहे, असेही मत प्राचार्य राव यांनी व्यक्त केले.
ग्रंथपालांची भूमिका महत्त्वाची - पी.पी. माहुलीकर
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.पी.पी. माहुलीकर यांनी ग्रंथालयाच्या बदलत्या स्वरुपावर प्रकाश टाकला. १९८०च्या काळात पुस्तकांचा संग्रह असायचा, आता ई-लायब्ररीमुळे हे चित्र पालटले असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना प्रत्येक अभ्यासक्रमासाठी गं्रथालयातील संदर्भ ग्रंथ मोठे उपयोगी ठरतात. त्यात ग्रंथपालांचीही भूमिका महत्त्वाची असून त्यातूनच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडते, असेही माहुलीकर यांनी नमूद केले.
व्यासपीठावर आवाज उठावा
ग्रंथपालांच्या प्रश्नांबाबत केवळ सोशल मीडियावर बोलले जाते व तसे संदेशही पाठविले जातात. मात्र ज्या वेळी व्यासपीठ उपलब्ध होते त्या वेळी कोणी आवाज काढत नाही. त्यासाठी अशा परिषदांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येकाने आपले प्रश्न मांडले पाहिजे, अशी अपेक्षा विनय पाटील यांनी व्यक्त केली.
या वेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. डॉ. दिलीप देशमुख यांनी आभार व्यक्त केले. या परिषदेला राज्यभरातील ग्रंथपाल उपस्थित असून दुपारी वेगवेगळ््या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
जळगावातून ‘मुक्ला’ची सुरुवात
ग्रंथपालांच्या विविध समस्या मांडण्यासाठी २०११पासून ‘मुक्ला’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आणि २०१३मध्ये त्यांची स्थापना करण्यात आली. याची पहिली बैठक १० मार्च २०१३ रोजी जळगावात झाली व येथूनच त्याची स्थापना झाल्याचा उल्लेख परिषदेत करण्यात आला. वाचनप्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी पारितोषिक देण्यात आले.
‘कॉन्फरन्स प्रोसेडिंग’चे प्रकाशन
या वेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते ‘कॉन्फरन्स प्रोसेडिंग’चे प्रकाशन करण्यात आले. युवराज माळी यांनी ही पुस्तिका तयार करून दिली असून प्रकाशनप्रसंगी तेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी लेवा हॉल परिसरात विविध प्रकाशनांतर्फे विविध ग्रंथांचे दालन स्थानिक तसेच राज्यभरातून आलेल्या प्रकाशकांनी लावलेले होते. सूत्र संचालन डॉ.चंद्रकांत सातपुते व शर्मिला गाडगे यांनी केले. डॉ.अनिल चिकाटे, शिरीष झोपे,सुनील पाटील, आर.सी.पाटील, सुधीर पाटील, मंगला मोरे, प्रशांत कोळी, प्रवीण अंबुस्कर, प्रीती पाटील, अनिकेत वारूळकर, ईश्वर राणे, नकुल गाडगे ग्रंथपाल यांचे सहकार्य मिळाले. १ डिसेंबर रोजीदेखील विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Web Title: Support of Librarians in the upliftment of society - Surge of the National Conference of Jalgaon Libraries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.