अज्ञात दात्यांनी दिला गरीब शालेय विद्यार्थ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 06:42 PM2018-08-22T18:42:00+5:302018-08-22T18:42:37+5:30

धरणगावात बूट, मोजे व कपड्यांचे वितरण

Support for poor school students given by unknown donors | अज्ञात दात्यांनी दिला गरीब शालेय विद्यार्थ्यांना आधार

अज्ञात दात्यांनी दिला गरीब शालेय विद्यार्थ्यांना आधार

googlenewsNext

धरणगाव, जि.जळगाव : समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी करावे या उदात्त हेतूने व दातृत्वाच्या भावनेतून काही अज्ञात दात्यांनी धरणगावातील गरीब विद्यार्थी व बालकांना मायेचा आधार दिला. विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासह आवश्यक असलेले बूट, मोजे देण्यात आले. विशेष म्हणजे मोठ्या स्वरुपाचा आर्थिक खर्च करूनही दात्यांनी आपली नावे समाजासमोर उघड करण्यास इन्कार केला.
धरणगावातील सर्वात जुनी व एकमेव असलेली मराठी जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.आर.एन.महाजने होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार चंद्रजीत राजपूत, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, प.रा.विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे, अ‍ॅड.संजय महाजन, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, नगरसेविका संगीता मराठे, विजय वाघमारे, पोलीस पाटील संघटनेचे पांडरंग सातपुते उपस्थित होते.
या शाळेतील गरीब ३५ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासह आवश्यक असलेले बूट व मोजे मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले.
यावेळी सर्वच मान्यवरांनी या सामाजिक कार्याचा आपल्या भाषणात गौरवास्पद उल्लेख केला. तहसीलदार सी.आर.राजपूत यांनी विद्यार्थ्यांना कुठलीही मदत लागत असल्यास हक्काने सांगण्याची विनंती शालेय प्रशासनाला केली. मुख्याध्यापक पी.जी.पाटील यांनी विद्यार्थ्यांतर्फे कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सामाजिक कार्यकर्ते गुलाब मराठे, अरविंद ओस्तवाल, प्रल्हाद पाटील, चंदू मराठे, योगेश वाघ, राहूल मराठे, कल्पेश महाजन यांनी परिश्रम घेतले.
मदतीचा अनोखा आदर्श
साधारणपणे कुणीही कुणाला मदत केली तर संबंधित व्यक्ती किंवा संघटना आपापला गौरव करून घेत असतात. परंतु मोठ्या प्रमाणातील आर्थिक मदतीनंतरही दात्यांनी आपल्या नावाचा कुठेच उल्लेख होणार नाही किंवा आपले नाव कुठल्याही पद्धतीने समोर येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळेच कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी अज्ञात दात्यांबद्दल गौरवोद्गार काढत त्यांचे कौतुक केले.
 

Web Title: Support for poor school students given by unknown donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.