केरळ पूरग्रस्तांसाठी साकरे विद्यालयातर्फे येथे मदतफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:57 PM2018-08-26T15:57:45+5:302018-08-26T15:58:09+5:30
ग्रामस्थांकडून उत्स्फूर्तपणे मदत
धरणगाव, जि.जळगाव : तालुक्यातील साकरे येथील बा.च.भाटिया माध्यमिक विद्यालयालयातील विद्यार्थ्यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी साकरे, निमझरी, कंडारी या तीन गावात मदतफेरी काढून रोख रक्कम, धान्य, क पडे गोळा केले.
संस्थेचे अध्यक्ष दिलीप रामू पाटील व मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील स्काऊट व गाईड विद्यार्थी व सर्व शिक्षक साकरे, निमझरी व कंडारी या तीनही गावात फिरून केरळ पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली.
तीनही गावातून नागरिकांनी धन्य, कपडे, भांडी, विविध संसारोपयोगी वस्तू व आर्थिक स्वरुपात मदत देऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या बॅनरच्या माध्यमातून तसेच केरळ येथील वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन विद्यार्थ्यांनी नागरिकांना मदत करण्यास आवाहन केले. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.