जळगावातील नाट्यगृहाच्या कामावर खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:32 PM2018-10-13T12:32:10+5:302018-10-13T12:32:47+5:30

नाट्यगृहाची दैना पाहून अजित पवारांनी उद्घाटनच केले नसते

Supriya Sule's criticism of work on the playground of Jalgaon | जळगावातील नाट्यगृहाच्या कामावर खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

जळगावातील नाट्यगृहाच्या कामावर खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

Next
ठळक मुद्देव्यक्त केली नाराजी #MeToo प्रकरणात सखोल चौकशी व्हावी

जळगाव : शहरात नव्याने उभारलेल्या बंदिस्त नाट्यगृहाची दैना पाहून अजित पवार यांनी या नाट्यगृहाचे उद्घाटनही केले नसते अशा शब्दात, खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे जळगाव ग्रामीण मतदार संघातील महिलांच्या मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी छत्रपती संभाजीराजे बंदिस्त नाट्यगृहात करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, माजी जिल्हाध्यक्षा विजया पाटील, प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील, महिला महानगर अध्यक्षा निला चौधरी,जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महिला कार्याध्यक्षा मिनल पाटील, युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, वाल्मीक पाटील यांच्यासह महिला तालुका अध्यक्षांची उपस्थिती होती.
नाट्यगृहातील व्यासपीठाकडे कटाक्ष टाकत त्यांनी नाट्यगृहाच्या कामाबाबत व अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘गहिऱ्या’ किंमती वाढल्या
सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात थेट महिलांशी संवाद साधला. गॅसच्या किंमती काय, पूर्वी किती होत्या. पेट्रोलच्या किंमती काय? परवडतात काय? यावर एका महिलेने किंमती ‘गहिºया’ वाढल्या असे उत्तर दिले. ‘गहिºया’ या शब्दाचा अर्थ समजून घेत भाषणात त्यांनी वारंवार या शब्दाचा उल्लेख केला.
अन् भारनियमन बंद केले
येथे मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी भारनियमनाची भेट दिली. पण आम्ही आंदोलन करताच जिल्ह्यातील भारनियमन बंद करण्यात आले असेही त्या म्हणाल्या.
नाट्यकर्मींनी दिले देवकरांना मानपत्र
ज्येष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील व अन्य नाट्यकर्मींनी नाट्यगृहाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा गौरव केला. मानपत्राचे वाचन नाट्यकर्मी हर्षल पाटील यांनी केले. शहरातील नाटयकर्मी यावेळी उपस्थित होते.
#MeToo प्रकरणात सखोल चौकशी व्हावी
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सुरू झालेली ‘मी-टू’ मोहीम चांगली. अत्याचाराच्या घटनांचा निषेध करते. अत्याचार ज्यांनी केले, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची सखोल चौकशी केली जावी. केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्यावही यात आरोप झाले आहेत. त्याबाबत पंतप्रधान दखल घेतील. डोक्यावर आजही हंडा कायम सत्तेत आल्यावर महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवून त्यांना घरापर्यंत नळ कनेक्शन देण्याचे काम करू असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी महिला मेळाव्यात दिले. मात्र यापूर्वी अनेक वर्षे आपले सरकार असताना या समस्या दूर का झाल्या नाहीत असे विचारले असता त्या म्हणाल्या, आपल्या मताशी मी सहमत आहे. यात सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे. कॉँग्रेसच्या अ‍ॅड. ललिता पाटील यांच्या उमेदवारीबाबत माहिती नसून कोणी भेटले म्हणून उमेदवारी मिळते असे नाही असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Supriya Sule's criticism of work on the playground of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.