जामनेर तालुक्यातील सूर प्रकल्प कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:04 AM2019-09-22T00:04:33+5:302019-09-22T00:04:41+5:30

४५ गावांना टंचाईची भीती

Sur project in Jamner taluka is dry | जामनेर तालुक्यातील सूर प्रकल्प कोरडाच

जामनेर तालुक्यातील सूर प्रकल्प कोरडाच

googlenewsNext





जामनेर : तालुक्यात यंदा आज पर्यंत ८१३ मिमी पाऊस झाला असून पावसाची टक्केवारी ११२.७ मिमी आहे. कांग व वाघूर नदीला गेल्या चार महिन्यात पाच ते सहा मोठे पूर गेले. मात्र सूर नदीच्या उगम क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस झाल्याने कापूसवाडी जवळील सूर प्रकल्प अद्याप कोरडाच असून मृत साठ्यात अवघी १० ते २० टक्केच वाढ झाली.
सूर नदीचा उगम बुलडाणा जिल्ह्यातील गिरड घाटात होतो. यंदा येथे कमी पाऊस झाल्याने सूर प्रकल्प भरू शकला नाही. सूर नदीवर धामणगाव व सावलतबारा येथे दोन धरणे आहेत. या धरणात साठा झाल्यानंतरच सूर प्रकल्पात पाणी पोहचत. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा प्रकल्प १०० टक्के भरला होता.
मत्स्य उद्योग संकटात
सूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात मासे टाकून वाढविले जातात. यंदा प्रकल्पात पाणीच नसल्याने मत्स्य उद्योग संकटात आला आहे.
या प्रकल्पातून कापूसवाडी, बेटावद बुद्रुक, खुर्द, रांजणी, मालदाभाडी, नवी दाभाडी, सोनारी, वाघारी आदी १२ व विदर्भातील १५ गावांना पाणी पुरविले जाते. भविष्यात या गावांना पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. मालदाभाडी येथील स्टार्च प्रकल्पास येथूनच पाणी पुरविले जात होते. सूर प्रकल्पातून १९ किमीचा पाट काढला गेला. मात्र आजपर्यंत एकदाही त्यात पाणी सोडले नाही. पाटावर झालेला कोटींचा खर्च वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Sur project in Jamner taluka is dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.