इटारसी पॅसेंजर आल्यावरच सुटणार सुरत पॅसेंजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 02:54 PM2018-09-03T14:54:41+5:302018-09-03T14:57:53+5:30
चाकरमान्याच्या सोयीसाठी भुसावळ येथे खासदार रक्षा खडसे यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा
भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून इटारसी वरून भुसावळला येणारी गाडी क्रमांक ५११५८ गाडी रावेरला लवकर यावी तसेच ही गाडी भुसावळला पोहोचल्यानंतरच सुरत पॅसेंजरला सोडण्याची अॅडजस्टमेंट करावी यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेच्या अधिकारी एडीआरएम मनोज सिन्हा वरिष्ठ परिचालन प्रबंधक डॉ.स्वप्नील नीला यांच्यासोबत चर्चा करून कुठल्याही परिस्थितीत चाकरमानाची व अप-डाऊन करणाºया प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी केली.
रेल्वे अधिकारी नीला यांनी स्थानकावरील सर्व फलाटांचे शेड्यूल किती बिझी आहे हे खडसे यांना समजावून सांगितले. यामधून कशाही पद्धतीने मार्ग काढावा तरच मी येथून जाणार, अशी तंबी खडसे यांनी अधिकाºयांना दिली. शेवटी यातून मार्ग काढण्यात आला.
चाकरमान्यांसाठी ये-जा करणाºयांसाठी तसेच गुजरातकडे जाणाºया प्रवाशांसाठी इटारसी पॅसेंजर भुसावळ स्थानकावर आल्यानंतरच सुरतला जाणारी पॅसेंजर अर्धा तासाचा फरकाने सोडावे. यावर अॅडजस्टमेंट करून इटारसी पॅसेंजर ९.३५ ला आल्यानंतर सुरत पॅसेंजर १०.०५ ला सुटेल यावर अंतिम चर्चा झाली.
यामुळे कनेक्टिंग प्रवास करणाºयांना मोठा दिलासा मिळाला असून, मोठी सोय झाली आहे.
याप्रसंगी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील, राजेश लाखोटे, सुयश न्याती, सुमित बºहाटे, गोलू पाटील उपस्थित होते.