जळगाव शहर मतदार संघातून सुरेश भोळे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:47 PM2019-10-24T13:47:04+5:302019-10-24T13:47:23+5:30
जळगाव - जळगाव शहर मतदार संघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेवार सुरेश भोळे यांनी ६४ हजार २८७ मतांनी आघाडी घेत प्रतिस्पर्धी ...
Next
जळगाव- जळगाव शहर मतदार संघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेवार सुरेश भोळे यांनी ६४ हजार २८७ मतांनी आघाडी घेत प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांचा पराभव केला. सुरेश भोळे यांना १ लाख १२ हजार २२८ मते मिळाली आहेत.
सकाळी ८ वाजेपासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली होती. पहिल्या फेरीपासून सुरेश भोळे यांनी आघाडी घेतली होती, ही आघाडी प्रत्येक फेरीमध्ये कायम ठेवून त्यांनी अखेर विजय मिळविला आहे.