सेवानिवृत्ती निमित्त सुरेश चांगरे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:37+5:302021-06-16T04:21:37+5:30

दिव्यांग गणेश पाटील यांचा सत्कार जळगाव : दिव्यांग बांधव गणेश पाटील यांनी आता पर्यंत ४४ वेळा रक्तदान केल्यामुळे त्यांचा ...

Suresh Changare felicitated on the occasion of retirement | सेवानिवृत्ती निमित्त सुरेश चांगरे यांचा सत्कार

सेवानिवृत्ती निमित्त सुरेश चांगरे यांचा सत्कार

Next

दिव्यांग गणेश पाटील यांचा सत्कार

जळगाव : दिव्यांग बांधव गणेश पाटील यांनी आता पर्यंत ४४ वेळा रक्तदान केल्यामुळे त्यांचा जागतिक रक्तदान दिनानिमित्ता जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, संचालक डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी, मानद सचिव डॉ. विनोद बियाणी, सुभाष सांखला, मुकुंद गोसावी, किशोर नेवे, जितू पाटील, गोविंद देवरे, संताराम एकशिंगे, राजेंद्र वाणी उपस्थित होते.

रेल्वेच्या पेंशन अदालतीत ६५ तक्रारी निकाली

जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे मंगळवारी झालेल्या ऑनलाईन पेंशन अदालतीत ६५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. यावेळी पेंशन अदालतीचे न्यायाधीन म्हणून डीआरएम विवेक कुमार गुप्ता, मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा, मंडळ कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे आदी अधिकारी उपस्थितीत होते. यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्मिक अधिकारी बी. एस. रामटेेके व इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.

जळगाव आगारात दुसऱ्या दि‌वशींही बंदोबस्त कायम

जळगाव : सोमवारी जळगाव आगारात वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी व चालक शैलेश नन्नवरे यांच्या झालेल्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या घटने प्रकरणी नन्नवरे यांच्यावरही गुन्हादेखील दाखल झाला आहे. त्यामुळे घटनेच्या पारर्शभूमीवर जळगाव आगारात दुसऱ्या दिवशींही सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे रक्तदात्यांचा सत्कार

जळगाव : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस बॅंकेतर्फे शहरातील नेहमी रक्तदान करणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला. अयाज मोहसीन, लखन वालेचा, प्रकाश सपकाळ, योगेश पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी शिवसेना समन्वय कक्ष प्रमुख जितेंद्र गवळी, भावेश ढाके, सुरज पाटील, भरत गायकवाड, अख्तर अली सय्यद, रेहान शेख, जावेद पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Suresh Changare felicitated on the occasion of retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.