ब्रेकिंग : जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह 48 जण दोषी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 01:42 PM2019-08-31T13:42:09+5:302019-08-31T14:08:05+5:30

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आरोपींना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

Suresh Dada Jain along with 48 convicted in Jalgaon Gharkul scam | ब्रेकिंग : जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह 48 जण दोषी 

ब्रेकिंग : जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह 48 जण दोषी 

googlenewsNext

जळगाव/धुळे - राज्यातील राजकारणात गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आरोपींना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.  दरम्यान, आज दुपारी धुळेन्यायालयामध्ये सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल. 

दरम्यान, आज झालेल्या सुनावणी वेळी आरोपींच्या वकिलांनी आरोपींचे वय विचारात घेण्याची तसेच ते काही सराईत गुन्हेगार नसून अनावधानाने चूक झाल्याचा युक्तिवात न्यायालयासमोर केला. आता दुपारी न्यायालय आरोपींना शिक्षेची सुनावणी करेल.

काय होता जळगाव घरकुल घोटाळा
तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मुलनासाठी स्वस्तात चांगली घरे बांधून देण्याची योजना आखली होती. त्यासाठी हुडको कड़ून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. दरम्यान, या योजनेच्या कामात अनियमितता असल्याचे 2001 मध्ये उघडकीस आले होते. तसेच पालिकेने ज्या जागेवर घरे बांधली ती जागा पालिकेच्या मालकीची नसल्याचे समोर आले. जळगावमधील हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा येथे सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरे बांधण्याच्या कामास सन 1999 मध्ये सुरुवात झाली. याचे काम सत्ताधाऱ्यांनी खान्देश बिल्डर्स या मर्जीतील बिल्डरला दिले होते. तसेच त्याला 29 कोटी रुपये बिनव्याजी देण्यात आले.

मात्र ठेकेदाराने हे काम विहीत वेळेत पूर्ण केले नाही. त्यानंतर काम पूर्ण करण्याची मुदत वारंवार वाढवली गेली. यादरम्यान, नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले.  ठेकेदाराला बिनव्याजी रक्कम वापरण्याची परवानगी मिळाल्याने पालिका कर्जबाजारी झाली.  दरम्यान डॉ. प्रवीण गेडाम  हे पालिका आयुक्त असताना ही  बाब लक्षात आली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत 29 कोटी 59 लाख 9 हजार रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयीन लढाई सुरू होती. 

Web Title: Suresh Dada Jain along with 48 convicted in Jalgaon Gharkul scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.