जेतवन बौद्ध विहार वार्ड अध्यक्षपदी सुरेश यशोदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:17+5:302021-05-29T04:13:17+5:30

भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील वार्ड क्रमांक एकमधील कंडारी प्लाॅट, सम्राट अशोक नगर येथे बुद्ध जयंतीनिमित्त जेतवन बौद्ध ...

Suresh Yashode as Jetavan Buddhist Vihar Ward President | जेतवन बौद्ध विहार वार्ड अध्यक्षपदी सुरेश यशोदे

जेतवन बौद्ध विहार वार्ड अध्यक्षपदी सुरेश यशोदे

Next

भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील वार्ड क्रमांक एकमधील कंडारी प्लाॅट, सम्राट अशोक नगर येथे बुद्ध जयंतीनिमित्त जेतवन बौद्ध विहार येथे कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यात जेतवन बौद्ध विहार वार्ड अध्यक्षपदी सुरेश यशोदे, तर सचिवपदी विजय बाऱ्हे यांची निवड करण्यात आली.

जेतवन बौद्ध विहार वार्ड अध्यक्षपद रिक्त होते. बुद्ध जयंतीच्यानिमित्त साधून नवीन वार्ड अध्यक्ष निवडीबाबत विचारविनिमय झाला. पूर्वकल्पना देऊन, वार्ड अध्यक्ष निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. विजय बाऱ्हे यांनी प्रस्ताव ठेवला.

सुरेश यशोदे यांना वार्ड अध्यक्ष करण्याबाबत संदीप शिंगारे यांनी सुचविले. त्यास जितेंद्र लोखंडे यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते सुरेश यशोदे यांची वार्ड अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

नूतन पदाधिकाऱ्यांचे आनंद हुसळे, दीपक वाघमारे, आनंदराव खेडकर, विजय रगडे, अहिरे, गौतम गाढे, गौतम शेजवळ व इतर मान्यवरांनी स्वागत केले.

Web Title: Suresh Yashode as Jetavan Buddhist Vihar Ward President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.