पारोळ्यात शाळकरी मुलांच्या सतर्कतेने चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 06:32 PM2018-04-24T18:32:40+5:302018-04-24T18:32:40+5:30

बसमध्ये चोरी करणाऱ्या चौघांवर कारवाई; अनेक गुन्हे उघडकीस येणार

Surprisingly with the alert of school children in Parola | पारोळ्यात शाळकरी मुलांच्या सतर्कतेने चोरटे जेरबंद

पारोळ्यात शाळकरी मुलांच्या सतर्कतेने चोरटे जेरबंद

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्याने ओळखले चोरटेचोरट्यांबाबत पोलीस पाटीलयांना दिली माहितीचोरट्यांनी दिली गुन्ह्याची कबुली

आॅनलाईन लोकमत
पारोळा, दि.२४ : पारोळा शिरसमणी टिटवी मार्गे भडगाव बस मधून अज्ञात चोरट्यांनी बॅगमधून सोने व रोख रक्कम लंपास केली होती. त्यानंतर आरोपी पुन्हा चोरीच्या इराद्याने तालुक्यात दाखल झाले असता त्यांना शाळकरी मुलाच्या जागृततेने पोलिसांनी ताब्यात घेतले.
धरणगाव तालुक्यातील भोणे येथील सासर असलेल्या प्रतिभा शिवराम पाटील हल्ली मुक्काम सुरत या सुरत येथून आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी टिटवी येथे जात होत्या.त्याच वेळी त्यांच्या बॅगमधून अज्ञात चोरट्यांनी सात हजार रुपये रोख व मंगल पोत, अंगठी, टॉप हे दागिने व रोकड रक्कम त्यांनी चोरून पसार झाले.
२१ रोजी हे चोरटे पुन्हा चोरी करण्याच्या इराद्याने पारोळा बस स्थानकात आले. शिरसमनी येथील शाळकरी मुलगा त्याच गाडीत होता. हे आरोपी त्याच्या समोर शिरसमणीत उतरून फरार झाले होते.
या मुलाने चोरट्यांना बघताच टिटवीचे पोलिस पाटील विनोद पाटील, बंटी पाटील, आदींना माहिती कळविली. त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती कळविली. पोलिसांनी पारोळा बस स्थानक गाठले. त्या ठिकाणी नदीम युसुफ सिद्दीकी रा. फैसलाबाद जी बुलदशाह (युपी), जाकिया उमदराज झोजे रा. फैसलाबाद जी बुलदशाह (युपी) अफसान मर्द ईरसान अन्सारी रा हातमाबाद जी बुलदशाह (युपी), मोहम्मद युसुफ इस्मामुद्दीन रा. फैसलाबाद जी बुलदशाह (युपी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांनी चोरीची कबुली दिली. मुद्देमाल त्यांनी चोपडा येथील एका लॉजमध्ये ते राहत होते तिथे ठेवला असल्याचे सांगितले. या लॉजवर तातडीने जाऊन पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून एक महिला व तीन पुरुष अशा चोरट्यांना अटक केली.

Web Title: Surprisingly with the alert of school children in Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.