सुरेल भक्तीगीतांनी रसिक झाले मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:07 PM2019-11-13T22:07:32+5:302019-11-13T22:08:01+5:30
जळगाव : ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था, माझे माहेर पंढरी यासह एकाहून एक सुरेल भक्तीगीते सादर करीत कलावंतांनी दाद मिळविली. ...
जळगाव : ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था, माझे माहेर पंढरी यासह एकाहून एक सुरेल भक्तीगीते सादर करीत कलावंतांनी दाद मिळविली.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. वासुदेव विठ्ठल तथा भैय्यासाहेब गंधे बहुउद्देशिय सभागृहाच्या नुतनीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी मंगळवारी सायंकाळी ‘ओंकार नाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन चिमुकले राम मंदिराचे पुजारी दादा महाराज जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय दावलभक्त, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, कार्याध्यक्ष अॅड. सुशील अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे यासह विश्वस्त व बांधकांम समिती प्रमुख प्रेमचंद ओसवाल उपस्थित होते.
यावेळी वास्तूविशारद सपन झुणझुणवाला यांचा सत्कार करण्यात आला. सुमारे दोन तास चाललेल्या या ‘ओंकार -नाद’ या कार्यक्रमाने जळगावकर मंत्रमुग्ध झाले होते.
तरुणांनी तयारीनिशी सादर केली गीते
गायिका श्रृती जोशी, सूरज बारी आणि अक्षय गजभिये यांनी विविध भक्तीगीते सादर केली. यामध्ये मोरया-मोरया गणपती बाप्पा मोरया, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, माझे माहेर पंढरी, विठु माऊली तू माऊली जगाची यासह विविध प्रकारची १७ भक्ती गीते सादर केली. कलावतांनी गायलेल्या प्रत्येक भक्तिगीतावर रसिकांची दाद मिळविली. त्यांना ललित वाघ, सूरज बारी यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन व आभार सोनिका मुजूमदार यांनी केले. रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.