शिक्षकावर पाळत ठेऊन हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:45 PM2019-02-15T12:45:15+5:302019-02-15T12:45:48+5:30
हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद
जळगाव : शाळेतून दुचाकीने बाहेर जात असलेल्या आर.आर. विद्यालयातील शिक्षक गिरीश रमणलाल भावसार (वय ४५ रा. निवृत्तीनगर) यांना दोन तरुणांनी दुचाकी अडवून जबर मारहाण के ल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता विसनजी नगरात घडली. या हल्ल्यात भावसार यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
गेल्या महिन्यात आर.आर.च्या प्रवेशाव्दारजवळ किर्तीकुमार शेलकर नामक शिक्षकाला टवाळखोरांनी मारहाण केली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा याच विद्यालयातील शिक्षकाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. एकाच शाळेच्या शिक्षकांना टवाळखोरांकडून मारहाण होत असल्याने यामागे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश भावसार हे आर. आर. विद्यालयात माध्यमिकच्या वर्गांना शिकवितात. आठवी व दहावीच्या वगार्ला समाजशास्त्र आणि मराठी विषय ते शिकवितात. नेहमीप्रमाणे गुरुवारी ते विद्यालयात आले. दुपारी शाळा सुटल्यानंतर ते आर. आर. विद्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले. विसनजी नगरातील जुन्या इंडोअमेरीकन हॉस्पिटलकडून जात असलेल्या रस्त्यावर महेश भोळे फुल भांडारजवळ मंदिरापाठीमागील बाजूस झाडाजवळ दोन तरुण भावसार यांची प्रतिक्षा करीत होते.
भावसार येताच या दोघांनी काही अंतरापर्यत त्यांचा पाठलाग करत एका तरुणाने डावा हात धरुन त्यांच्या तोंडावर फायटर घातलेल्या हाताने मारहाण केली.
यात दुचाकीवरुन तोल जावून भावसार खाली पडले. नागरिकांनी धाव घेवून त्याला उचलले व रक्तबंबाळ झालेल्या भावसार यांना एका बाजूला बसविले. गर्दी जमा होताच हल्लेखोर तेथून पसार झाले.
हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद
भावसार यांच्यावर हल्ला झाला. त्या परिसरात दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. घटनेची माहिती मिळताच विद्यालयाचे शिक्षक एन. एल. सपकाळे, एन. आर.कुमावत, आर. एम. झंवर, के. टी.वाघ, आर. बी. महाजन, एल.जी.भारुडे, के. जी. सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. भावसार यांना प्रारंभी जिल्हापेठ पोलीस स्टेशन व तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले. मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून नाकाचे हाड मोडले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी भावसार यांच्यावर हल्ला झाला. त्या परिसरात दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. घटनेची माहिती मिळताच आर. आर. विद्यालयाचे शिक्षक एन.एल.सपकाळे, एन.आर.कुमावत, आर.एम.झंवर, के. टी.वाघ, आर.बी.महाजन, एल.जी.भारुडे, के.जी.सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. भावसार यांना प्रारंभी जिल्हापेठ पोलीस स्टेशन व तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले. मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून नाकाचे हाड मोडले आहे. नाकातून रक्तश्राव थांबत नसल्याने शिक्षकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
हल्लयामागे नेमके कोण?
गेल्या महिन्यात आर.आर.विद्यालयाचे शिक्षक किर्तीकुमार शेलकर यांना विद्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळच भरदिवसा दोन तरुणांनी बेदम मारहाण केली होती. आता भावसार यांना मारहाण झाली आहे. सतत शिक्षकांना मारहाण होणे, एकाच टवाळखोर गटाचा वापर होणे यामागे नेमके कोण व कारण काय? आहे याबाबत आता उलटसुलट चर्चा होत आहे. संस्था व शिक्षकांच्या जुन्या वादातून तर मारहाण झाली नाही ना? अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे. दोन्ही घटनांमध्ये भीतीपोटी शिक्षकांनी पोलिसांनी तक्रार दिलेली नाही.
दुसऱ्यांदा घटनेने दहशत... यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी आर.आर. शााळेच्या गेटजवळ किर्तीकुमार शेलकर या शिक्षकाला मारहाण झाली होती. दहशतीमुळे या शिक्षकाने तक्रार दिली नव्हती. आता पुन्हा हा प्रकार घडला. शिक्षकांवर हल्ला होत असताना ना पोलीस प्रशासन काही करत ना शाळेचे प्रशासन. हल्ल्याच्या सतत घडणाºया या घटनांमुळे शाळेतील शिक्षक वर्ग मात्र दहशतीत वावरत असल्याचेच लक्षात येते. या प्रकरात पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी अपेक्षा या निमित्त शिक्षण क्षेत्राकडून केली जात आहे.