पांझरा नदीवरील तांदळी - पढावद बंधारा कामाचे सर्वेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:17 AM2021-05-27T04:17:29+5:302021-05-27T04:17:29+5:30
पढावद गावाच्या अमरधामपासून पांझरा नदीपात्रापर्यंत २१० मीटरचा रस्ता व तांदळी गावापासून नदीपर्यंत २७५ मीटर लांबीच्या रस्त्याचा यात समावेश आहे. ...
पढावद गावाच्या अमरधामपासून पांझरा नदीपात्रापर्यंत २१० मीटरचा रस्ता व तांदळी गावापासून नदीपर्यंत २७५ मीटर लांबीच्या रस्त्याचा यात समावेश आहे. नदीच्या पातळीपासून सुमारे साडेतीन मीटर उंचीचा हा बंधारा-कम ब्रिज राहणार असून, यात नदीपासून बंधारा दीड मीटर व त्यावर दोन मीटर उंच पूल असेल. यासाठी नदीच्या दोन्ही बाजूंकडील क्षेत्र हे वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने खाजगी जमीन अधिग्रहण व मोबदला इ. त्रासदायक बाबी नसल्याने बंधारा मुदतीत सहज पूर्ण होणार असल्याची शक्यता वासुदेव पवार (सहायक अभियंता ल. पा. वि. धुळे) यांनी वर्तवली. यासाठी वन विभागाच्या परवानगीच्या कार्यवाहीस सुरुवात केल्याचेही पवार यांनी सांगितले.
दोन तालुके येतील जवळ
सदरहू बंधारा-कम ब्रिज पूर्ण झाल्यास अमळनेर व शिंदखेडा या दोन तालुक्यांचे अंतर कमी होईल, पुढे शिरपूर मार्गे राष्ट्रीय महामार्ग जोडला जाईल. बंधाऱ्यामुळे तांदळी व पढावद गावांना सिंचनाचा लाभ होईल. पढावदकरांच्या शेतजमिनी पांझरा नदीपलीकडे तांदळी व शहापूर शिवारात आहेत. पावसाळ्यात शेतात जायला मार्गच नसतो, या ब्रिजमुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत रस्ता होईल. ब्रिजवरून दुचाकी, चारचाकी व इतर लहान वाहनांची सोय होईल. तांदळी व पढावद ग्रामस्थांनी या कामाचे स्वागत केले असून, सर्वेक्षणकामी आलेल्या शाखा अभियंता पवार व त्यांच्या पथकास सहकार्य केले.