शेतक:यांविनाच शेततळ्यांसह नाल्यांची जलसंधारण मंत्र्यांकडून पाहणी

By admin | Published: May 12, 2017 04:21 PM2017-05-12T16:21:53+5:302017-05-12T16:21:53+5:30

भुसावळ तालुक्यातील जलयुक्त शिवारातील कामांचा घेतला आढावा

Survey by the water conservation ministers of the rivers along with the farmers without the farmers | शेतक:यांविनाच शेततळ्यांसह नाल्यांची जलसंधारण मंत्र्यांकडून पाहणी

शेतक:यांविनाच शेततळ्यांसह नाल्यांची जलसंधारण मंत्र्यांकडून पाहणी

Next

 ऑनलाईन लोकमत विशेष /गणेश वाघ  

भुसावळ, दि.12 - जलयुक्त शिवारांसह नाला खोलीकरण व गाळ काढणे योजनेच्या शुभारंभासाठी जिल्हा दौ:यावर आलेल्या जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या गोजोरा येथील भेटीत शेतक:यांची अनुपस्थिती दिसून आली़ कृषी विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही आफत ओढवली़ कुठलेही नियोजन नसल्याने नागरिक कमी आणि मंत्र्यांचा ताफा अधिक असे विसंगत चित्र कामांच्या पाहणीप्रसंगी दिसून आल़े
शुक्रवारी दुपारी मुक्ताईनगर तालुक्यातील दौरा आटोपल्यानंतर गोजोरा गावाजवळील शेततळ्यासह नाला खोलीकरण कामांची शिंदे यांनी पाहणी केली़ प्रसंगी आमदार संजय सावकारे, उपसभापती मनीषा पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार मीनाक्षी चव्हाण, तालुका कृषी अधिकारी पी.डी.देवरे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, प्रा़सुनील नेवे, सुधाकर जावळे, वरणगावचे नगरसेवक गणेश धनगर, बबलू माळी, भालचंद्र पाटील, गोजोरा सरपंच शिवाजी पाटील, वांजोळा सरपंच नरेंद्र पाटील व उपसरपंच देविदास सावळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़े
मंत्र्यांना बसला उन्हाचा फटका
45 अंशाच्या रणरणत्या उन्हात नाला खोलीकरणाची कामाची करताना राज्यमंत्री राम शिंदे यांना उन्हाचा चांगलाच फटका बसला़ गळ्यातील हातरुमाल डोक्याला बांधण्याची त्यांच्यावर वेळ आली़
कृषी विभागाचे ढिसाळ नियोजनाचे प्रदर्शन
जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री येत असताना स्थानिक तालुका कृषी अधिका:यांनी कुठलेही नियोजन केले नाही. प्रसिद्धी माध्यमांना कुठलीही माहिती न पुरवल्याने कार्यक्रम ठिकाणी शेतकरी आलेच नाही़ 16 वाहनाच्या ताफ्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच भाजपाचे पदाधिकारी सोडल्यानंतर शोधूनही शेतकरी दिसून आले नाहीत. अपवाद केवळ गोजो:यातील ज्यांच्या शेततळ्याची पाहणी झाली त्या शेतक:याचा!
पाईप आहे कुठे? अधिका:यांना फूटला
गोजोरा येथील नाला खोलीकरण कामाची पाहणी करताना खरोखर पाईप टाकला आहे वा नाही? अशी गुगली शिंदे यांनी टाकताच, कृषी विभागाच्या अधिका:यांना चांगलाच घाम फुटली़ कधी पाईप टाकण्यात आला, किती लांबीचा व रूंदीचा तो आहे, अशी प्रश्नांची सरबत्तीही झाली़ अखेर अधिका:यांनी नाल्यात उतरुन हाताने माती बाजूला करीत दोन फूट खोलवर पाईप दाखवल्यानंतर शिंदे यांचे समाधान झाल़े

Web Title: Survey by the water conservation ministers of the rivers along with the farmers without the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.