जलसंपदामंत्र्यांकडून जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 03:48 PM2018-10-26T15:48:50+5:302018-10-26T15:54:47+5:30
जामनेर तालुक्यातील सोनारी, वाडी, मालदाभाडी व वाडी किल्ला या गावांतील पिकांची गुरुवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली.
Next
ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांनी घेतली पिकांची माहितीमदतीची शेतकऱ्यांनी केली मागणीअनियमित पावसामुळे उत्पन्नात मोठी घट
जामनेर : तालुक्यातील सोनारी, वाडी, मालदाभाडी व वाडी किल्ला या गावांतील पिकांची गुरुवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. महाजनांकडे दुष्काळग्रस्त सहा तालुक्याच्या पाहणीची जबाबदारी सोपविली आहे.
महाजन यांचे सोबत तहसीलदार नामदेव टिळेकर, कृषी अधिकारी रमेश जाधव, विलास पाटील, नवल राजपूत, दीपक तायडे, मंडल अधिकारी, तलाठी होते. महाजन यांनी या भागातील शेतांची व पिकांची पाहणी केली. यंदा अनियमित पावसाने उत्पन्नात मोठी घट आली आहे. शासनाकडून मदत मिळवून देण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी मंत्र्यांकडे केली.