वरणगावला राज्यस्तरीय पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 04:21 PM2017-09-23T16:21:14+5:302017-09-23T16:22:17+5:30
नगरपालिकेकडून 827 वैयक्तीक शौचालयांची उभारणी
ऑनलाईन लोकमत
वरणगाव,ता.भुसावळ,दि.23 : वरणगाव नगरपालिकेने 827 वैयक्तीक शौचालयांची उभारणी केली आहे तर महिला आणि पुरुषांसाठी 207 सीटच्या 18 सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली आहे. वरणगाव नगरपालिकेच्या हगणदारीमुक्तीच्या प्रयत्नांची राज्यस्तरीय पथकाने दोन दिवस पाहणी केली.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हगणदारी मुक्तीची तपासणी राज्यस्तरीय पथकाकडून दोन दिवस करण्यात आली. पथकात उपायुक्त (धुळे) रवींद्र जाधव, जिल्हा प्रशासन अधिकारी राजेश कानडे, अमळनेर न.पा.चे मुख्याधिकारी उत्कर्ष गुटे व योगेश सोनवणे यांचा समावेश होता. पथकाने सार्वजनिक शौचालय, नगरपालिकेने अनुदान तत्वावर व्यक्तिगत शौचालय वापरली आहेत किंवा नाही याची माहिती घेतली. रात्री व पहाटे लोक उघडय़ावर शौचास जातात का याची पाहणी पथकाकडून करण्यात आली.