जळगावात संततधारने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:50 AM2018-08-22T11:50:49+5:302018-08-22T11:58:50+5:30

अनेकांचे संसार पाण्यात

Survival of Jalgaon causes life | जळगावात संततधारने जनजीवन विस्कळीत

जळगावात संततधारने जनजीवन विस्कळीत

Next
ठळक मुद्देरस्त्यांची प्रचंड दुरवस्थाकचऱ्या साचल्याने आरोग्य धोक्यात

जळगाव : सोमवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील झोपडपट्टी भागासह नाल्यालगत असलेल्या परिसरात जवजीवन विस्कळीत झाले असून रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहे. तांबापुरा भागात घरे गळत असल्याने अनेकांचे संसार पाण्यात आहे तर मेहरुणमधील रेणुकानगर, पिंप्राळा हुडकोत परिसरात घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी या भागात तर रस्त्यांची चाळणी झाल्याने चालणे कठीण होत आहे. या सोबतच या सर्व भागांमध्ये कचरा साचून दुर्गंधी पसरण्यासह डासांचा त्रास वाढल्याने आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.घरांना पाण्याचा वेढा पडला होता. शहरासह परिसरातील नशिराबाद, शिरसोली, दापोरा, म्हसावद परिसरातही झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
जोरदार पाऊस झाल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. मात्र जोरदार पावसामुळे शहरातील नाल्यालगत असलेल्या व झोपडपट्टी भागातील रहिवाशांचे दरवर्षी प्रचंंड हाल होत असतात. त्याप्रमाणे यंदाही १६ रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर पुन्हा २० रोजी सुरू झालेल्या व मंगळवारी संध्याकाळपर्यंत सलग २४ तास सुरू असलेल्या पावसामुळे या भागांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने प्रत्यक्ष त्या भागांमध्ये जाऊन पाहणी केली असता नागरिकांचे प्रचंड हाल होण्यासह आरोग्यासाठी धोकादायक असणारे चित्र दिसून आहे.
तांबापु-यात घरांमध्ये पाणी
तांबापुरा भागात अनेक झोपडी वजा घरे गळत असल्याचे दिसून आहे. यामुळे घरांमध्ये पाणी साचल्याने संपूर्ण संसारच पाण्यात आहे. घरे गळत असल्याने घरातील पाणी वारंवार बाहेर फेकावे लागत आहे. कोणी भांड्यांच्या सहाय्याने तर कोणी कपड्याने पाणी निपळून बाहेर काढत आहे. मात्र सलग सुरू असणाºया पावसामुळे खाली पाणी काढत नाही तोच पुन्हा छतातून पाणी गळणे सुरूच आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी पाणी फेकून-फेकून हैराण झाले आहे. या पाण्यामुळे घरातील भांडे, गॅस, अंधरुन यासह सर्व साहित्यदेखील पाण्यात आहे. इतकेच नव्हे स्वयंपाक करणेही कठीण होत असल्याने उपाशी राहण्याचीही वेळ येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. अनेक घरांमध्ये पाणी गळणाºया ठिकाणी भांडे लावले असून त्यात पाणी साचले की ते १०-१५ मिनिटांनी फेकत आहे.
रात्र काढली जागून; अबालवृद्धांचे हाल
तांबापुरातील घरात पाणी असल्याने जमिनीवर असो की खाटेवर अंथरूण टाकता येत नाही. झोपायलाही जागा नाही. त्यामुळे सोमवारी रात्री अनेकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. यामध्ये लहान मुले व वृद्धांचे अधिक हाल होत असल्याचे येथे चित्र आहे.
रेणुकानगरात घरांना पाण्याचा वेढा
मेहरुण परिसरातील रेणुकानगरात तर अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. बाहेर पाणीच-पाणीच असल्याने घराबाहेर जावे कसे असा प्रश्न या रहिवाशांसमोर उभा राहिला आहे. संपूर्ण घरच पाण्यात असल्याने घरांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण होत आहे. घराबाहेर जाताना एकमेकांचा आधार घेत मोठी कसरत करीत नागरिक येथून वापरत आहे. त्यात सरपटणाºया प्राण्यांची भीती मनात कायम असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या पाण्यामुळे रात्रंदिवस डासांचा त्रास होत आहे तर रात्री पाण्यातील बेडकांच्या आवाजामुळे झोपही लागत नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. या घरांसमोरच असलेल्या नाल्यालगत कचºयाचे ढीग लागलेले आहे. या कचºयामुळे वाढलेल्या डासांचाही त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
शौचालयाजवळही साचले पाणी
मेहरुण परिसरातीलच रेणुकानगर समोर असलेलेल्या नाल्या लगतच्या सार्वजनिक शौचायलयाजवळही पाणी साचले आहे. त्यामुळे नाल्याला पाणी वाढले की, शौचालयातदेखील जाणे बंद होते. त्यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल होतात.
पंचमुखी महादेव मंदिराजवळून वाहणाºया नाल्यात कचराच कचरा
मेहरुण भागातील पंचमुखी महादेव मंदिराजवळून वाहणाºया नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. यात प्लॅस्टिक कचरा अधिक असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येतात. हा कचरा काढला जात नसल्याने नाल्याचे पाणी रहिवाशी भागात शिरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. मनपा याकडे दुर्लक्ष करून दोन वर्षापूर्वी उद््भवलेली स्थिती पुन्हा निर्माण करीत आहे का असा सवालही येथील रहिवाशांनी उपस्थित केला.
कचºयाच्या ढिगांमुळे माशा, डास, दुर्गंधी
तांबापुरा, मेहरुण, रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी या सर्वच भागांंमध्ये जागोजागी कचºयाचे ढीग लागलेले आहे. या कचºयांवर डुकरांचीही संख्या मोठी असल्याचे पाहणी दरम्यान दिसून आहे. हा कचरा पाण्यामुळे कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सोबतच कचºयामुळे डासांची उत्पत्ती होण्यासह माशांचीही संख्या वाढली आहे.
अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात
मेहरुण भागातील पंचमुखी महादेव मंदिरासमोर असलेल्या मोकळ््या जागेत तर सर्वत्र चिखल झाला आहे. या सोबतच रस्त्यांवरदेखील जागोजागी चिखल असून कचºयांसह डुकरांच्या अंगावरील माशा, डास घरांपर्यंत पोहचत असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले.
रस्त्यांची चाळणी
मेहरुण भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या सोबतच रामेश्वर कॉलनीमधील सप्तश्रृंगी नगरातील लाल बाग चौकात रस्त्यांची चाळणी झाली आहे. इतकेच नव्हे मेहरुणकडून रामेश्वर कॉलनीकडे जाणारा रस्ता, शिवाजी उद्यान ते रामेश्वर कॉलनी, तांबापुरा, सुप्रीम कॉलनी या भागातही रस्त्यांची बिकट स्थिती आहे. इच्छादेवी चौक ते शिरसोली रस्त्यावरदेखील जागोजागी मोठे खड्डे पडलेले असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयापासून शिरसोली रस्त्याकडे जाणाºया मार्गाचीही पावसामुळे दैना झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावरील खडी, डांबर उखडल्याने ते वाहन धारकांसाठी धोकेदायक ठरत आहे. अशीच स्थिती शहरातील इतर भागांमध्येही आहे.
तीन-तीन महिने साचून राहते पाणी
रेणुकानगरात घरांभोवती साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. दरवर्षी या ठिकाणी पाणी साचून ते किमान तीन महिने तरी तसेच राहते, असा अनुभव नागरिकांनी सांगितला. एवढ्या दिवस या रहिवशांना कसरत करीत येथून ये-जा करावी लागते.
सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांचेप्रचंडहाल
सुप्रीम कॉलनी परिसरातही रहिवाशांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्य रस्ता बरा असला तरी अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे. लहान-लहान गल्ली-बोळांमध्ये झालेल्या चिखलामुळे पायी चालणे कठीण असून दुचाकीस्वारांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.
या भागातही चिखलामुळे व साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढत आहे व कचºयामुळे दुर्गंधी पसरत आहे.
अनेक झोपड्यांवर मेनकापड
तांबापुरा, रामेश्वर कॉलनी, मेहरुण तसेच सुप्रीम कॉलनी या भागात असलेल्या झोपड्या तसेच फळ््यांच्या घरांना मेनकापड लावून पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न रहिवाशी करीत आहे. असे असले तरी जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी गळतच असल्याने रहिवाशांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Web Title: Survival of Jalgaon causes life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.