सूर्यकन्या तापी नदी जन्मोत्सवानिमित्त पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 12:44 PM2017-06-30T12:44:41+5:302017-06-30T12:44:41+5:30

भुसावळ, अजडनाड येथे साडी-चोळी व अध्र्य अर्पण करून पूजन

Suryakanya Tapti River celebrates the birth anniversary of Tapti River | सूर्यकन्या तापी नदी जन्मोत्सवानिमित्त पूजन

सूर्यकन्या तापी नदी जन्मोत्सवानिमित्त पूजन

Next

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ, दि.30 - सूर्य कन्या तापी नदीच्या जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी 11 वाजता भुसावळच्या इंजिन घाटासह रावेर तालुक्यातील अजनाड येथील तापी नदीच्या तिरावर साडी-चोळी व अध्र्य अर्पण करून पूजा करण्यात आली़ यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
भुसावळ शहरातील तापी नदीच्या इंजिन घाटावर शुक्रवारी 11 वाजता अभिराज नागला, मोंटू वर्मा, नारायण नागदेव, सोमनाथ चौरसिया, राजू गुरव यांनी सपत्नीक तापी नदीचे पूजन केल़े प्रशांत वैष्णव, पं़रवीओम शर्मा, प्रदीप नेहेते, श्रीकृष्ण चोरवडकर, ज़ेबी़कोटेचा, नमा शर्मा, अभय वर्मा आदींची उपस्थिती होती़
स्कंदपुराणात तापी नदीचे वर्णन
स्कंदपुराणातील तापी माहात्म्यात तापीमाईची वर्णलेली महती महानद्यांपेक्षा अनन्यसाधारण महत्त्व विषद करणारी अशी आहे. ब्रम्हांडनायक नारायणाचे ब्रम्हदेव सुपुत्र तर ब्रम्हदेवाचे कश्यप हे सुपुत्र होत. कश्यप व आदिती या दाम्पत्त्यापासून ब्रम्हांडात द्वादश सूर्याची उत्पत्ती झाली. त्यातील ‘विवस्नान’ नामक सूर्याची तापी ही सुकन्या असल्याची महती त्यात विषद केली आहे. विवस्नान सूर्याचा ताप (दाह) प}ी संज्ञा हीला सहन न झाल्याने तिने ‘छाया’ स्वरूप स्वत: ची प्रतिकृती निर्माण करून सुर्याशी समागमन केल्याचे त्यात स्पष्ट केले आहे. त्याच ‘छाया’ स्वरूप संज्ञाची तापी ही थोरली सुकन्या असून शनि हा  तापीचा सख्खा भाऊ आहे. यमदेव व यमुना नदी तथा अश्विनीकुमार देवही तापीचे भाऊ - बहिण असल्याची अख्यायिका आहे. 
तापी नदीला प्रसन्न करण्यासाठी नारदांची तपोसाधना
देवर्षी नारदांनी नावथा या ब:हाणपूरपासून 30 कि.मी.लांब असलेल्या पावनस्थळी तापीला प्रसन्न करण्यासाठी तपोसाधना केल्याची आख्यायिका आहे. तापीकाठी कण्वऋषींनी, उद्दलक ऋषींनी उदळी येथील तापीकाठी, कपीलमुनींनी कंडारी येथील तापीतटावर, श्रृंगऋषींनी सिंगत येथे तापीतटावर तपोसाधनेतून मोक्षप्राप्ती केल्याची आख्यायिका आहे.
अजनाड येथे यज्ञहवनाची आख्यायिका 
सुरयवंशातील रघुराजांचे पुत्र दशरथ व राजा दशरथांचे आजोबा राजा अजनाब यांनी असुरांची आहुती समर्पित करून सुर्यकन्या तापीमाईचा खान्देशात आद्यप्रवेश होत असलेल्या पावन स्थळी अर्थात अजनाडला यज्ञहवन केल्याची आख्यायिका आहे. त्या अनुषंगाने राजा अजनाब यांच्या नावाचा अपभ्रंश होवून या गावाचे नामकरण अजनाड झाल्याचे जाणकार सांगतात़ त्या तपोसाधनेची पावनभूमी आजही ‘भभूती’ नावाच्या बर्डीने सुपरिचित असून त्याठिकाणी असूरांचे अस्थी, दंत व दहीहंडीच्या घाघरींचे अवशेष आढळून येतात. 
मुल्ताई येथून तापीनदीचा उगम
जीवनदायीनी मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुल्ताई येथे उगम पावलेल्या सूर्यकन्या तापीमाई पूर्व- पश्चिम प्रवाहीत झालेली महानदी आहे. मध्य प्रदेशातील निमाड प्रांत, महाराष्ट्रातील अजनाड येथे प्रवेश घेतल्यानंतर रावेर, मुक्ताईनगर,  भुसावळ, यावल, चोपडा, धुळे, शहादा, नंदुरबार व थेट गुजरात मध्ये सुरतजवळ 724 किमी लांबीच्या अंतरावरून वाहून येत अरबी समुद्रात विलीन होणारी ही महानदी आहे.  
 

Web Title: Suryakanya Tapti River celebrates the birth anniversary of Tapti River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.